Trupti Desai यांची इंदुरीकर महाराजांवर टीका : पैसे कमवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच दिलाय का?
Trupti Desai : एखादी महिला पुढे गेली तर निवृत्तीमहाराज देशमुख (इंदुरीकर) यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्या कोणत्याही किर्तनात पहा. ते सासू-सुनाबाबत, महाविद्यालयीन तरुणी नाही तर ज्येष्ठ महिलांबाबत तोंडसुख घेत असतात. आता गौतमी पाटीलला तिच्या कलेचे जास्त मानधन मिळत आहे. तर तेही या महाराजांना पचत नाही. मग माझ्या सवाल आहे की, पैसा कमविण्याचा अधिकार काय फक्त निवृत्तीमहाराज देशमुख यांनाच दिला आहे का, त्यांना इतरांच्या मानधनावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला आहे.
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांनी एका किर्तनात आपण पाच हजार रुपये जास्त मागितले तर लोकं लगेच नाक मुरडतात. मात्र, दुसरीकडे ३ गाण्यांच्या डान्ससाठी दीड लाख रुपये सहजपणे देतात, असे म्हणत अप्रत्यक्षपणे गौतमी पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून या वादात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे. तृप्ती देसाई यांनी ”लेट्सअप”शी बोलताना निवृत्तीमहाराज देशमुख यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Trupti Desai म्हणतात… ‘या’ आक्रमक नेत्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत…! – Letsupp
तृप्ती देसाई म्हणाल्या की, निवृत्तीमहाराज देशमुख हे एक आश्रमशाळा चालवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. उद्या जर इंदुरीकर महाराजांनी मला आश्रम शाळेत भेट द्यायला बोलवलं तर मी आनंदाने जाणार आहे. आम्ही त्यांच्या शाळेच्या विरोधात अजिबात नाही. तर फक्त महिला पुढे जात असताना त्यांच्या मानधन आणि इतर गोष्टींवर आक्षेप घेणाऱ्या प्रवृत्ती बद्दल बोलत आहे. तुम्ही तुमच्या किर्तनातून काय मानधन घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. त्याबद्दल आम्हाला काहीही आक्षेप नाही. मात्र, दुसऱ्याला मिळत असलेल्या जास्त मानधनाबाबत तुमच्या पोटात का दुखतं, असा सवाल तृप्ती देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईं यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी कोणत्याही बाबाच्या विरोधात नाही. पण, महिलांबाबतच्या भूमिकेबाबत पुरूषी मानसिकता याबद्दल आहे. एखादी महिला पुढे जायला लागली तर लगेच का पोटात का दुखत आहे. एखादी महिला पैसे कमवायला लागली आणि तेही आपल्या पेक्षा जास्त पैसे कमवायला लागली तर का खटकत आहे. या वृत्तीला आमचा विरोध आहे, असे देखील देसाई यांनी स्पष्ट केले आहे.