Neet Exam Paper Leak : नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी (Neet Exam Paper Leak) अटकेत असलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरचे नवनवीन कारनामे सीबीआयकडून उघड केले जात आहेत. खाजगी क्लासेससोबत शिवराज मोटेगावरकरला (shivraj Motegonkar) मेडिकल कॉलेजची स्वप्न पडू लागली होती. त्यासाठी शिवराजने मोटेगावकरने लातुरमध्ये भूखंड खरेदी करुन बांधकामही सुरु केले असल्याची माहिती समोर आलीयं. खाजगी क्लासेसच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांमधून मोटेगावकर थेट मेडिकल कॉलेज उभारण्याच्या तयारी होता, अशी माहिती तपासात उघड झालीयं.
अनेक वर्षांपासून खाजगी क्लास घेत असलेला शिवराज मोटेगावकर हा डॉक्टर नसून त्याच्या घरात कोणीही डॉक्टर नाही. त्यामुळे आपल्या मुलाला डॉक्टर बनवून त्याच्या नावे लातुरात एक मेडिकल असावं, असं स्वप्न बाळगून मोटेगावकरने मेडिकल कॉलेजसाठी जमीन खरेदी केली. त्यानंतर या जमिनीवर बांधकामही सुर केले होते. मात्र नीट परीक्षा लिक प्रकरणी अटक झाल्यानंतर मोटेगावरकर चांगलाच अडचणीत आलायं.
एकाचवेळी आठ भूखंड खरेदी…
मोटेगावरकरने लातुरमध्ये एकाचवेळी आठ भूखंड खरेदी केल्याचं समोर आलं. अनिल अग्रवाल नामक व्यक्तीसोबत व्यवहार केल्याची नोंद आरटीआर कार्यकर्त्यांनी समोर आणलीयं. उद्योग भवन परिसरातील भूखंड विकत घेता येत नाही तरीही भूखंड खरेदी केल्याचं समोर आलं. साडेसहा कोटी रुपयांची मालमतत्ता खरेदी केल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढंच नाही तर हा खरेदी व्यवहार पावती तिकीटावर झाला असल्याची नोंद समोर आलीयं.
मुलाचीही चार तास चौकशी…
शिवराज मोटेगावरकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आलीयं. त्याने फुटलेला पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला आहे.
