नीट पेपर प्रकरणात राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Gunratna Sadavarte On Raj Thackeray : नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्लीती जंतर मंतर मैदानावर 20 दिवसांपासून आंदोलन करणारे सामाजिक

Gunratna Sadavarte On Raj Thackeray

Gunratna Sadavarte On Raj Thackeray

Gunratna Sadavarte On Raj Thackeray : नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्लीती जंतर मंतर मैदानावर 20 दिवसांपासून आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याने वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? असं त्यांनी म्हटलं आहे. तर सोनम वांगचुक युवकांच्या भावनांशी खेळत असून त्यांच्या जागी राज ठाकरेंना उपोषणाला बसवावं असं देखील ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले की, सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचं आंदोलन म्हणजे वैद्यकीय परीक्षेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारावर इमोशनल ब्लॅकमेलिंग करत पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. देशात आणि राज्यात ते सुरु झालंय. दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन भारताच्या संविधानाला मानतात का हे विचाराव वाटत आहे. मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असताना आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले होते सारखाच कायदा सोनम वांगचुक यांना लागू होतो.

सोनम वांगचुक हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. मरेपर्यंत उपोषण कोणालाही करता येत नाही. संविधान विरोधी हलकी का वाजवली जाते आहे, संविधानाविरोधी ढोकली का वाजवली जात आहे? असं माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का?

तर दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक आणि राज ठाकरेंना आता तपास अधिकारी करायचं का? ढोबळ भाषेत सांगायचं तर, राज ठाकरेंना ढेकळं कळतात का? असं माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले. राज ठाकरे आता वाजंत्रीवाल्यासारखं आता हलकी वाजवणारे झाले आहेत का ? त्यांना त्यांचे प्रश्न संपले आहेत का? पेपरफुटी प्रकरण गंभीर आहे मात्र यंत्रणांवर विश्वास ठेवायचा असतो.

FIFA World Cup Final : इतिहासात पहिल्यांदाच फिफा देणार खेळाडूंना ‘चॅम्पियनशिप रिंग्ज

आता मुंबईत मोर्चा काढला जाईल, राज ठाकरेला आता सोनम वांगचुकचा पुकळा आलाय. राईट टू लाईफच्या अधिकाराने सोनम वांगचुकला बाजूला करत राज ठाकरेंना उपोषणाला बसवावं मात्र बिना माल ओढता अशी टीका देखील गुणारत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

Exit mobile version