Download App

राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, शिंदे सरकारचा निर्णय

राज्यात आता 9 नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना राज्य सरकाकडून परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

9 नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 4 हजार 365 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. राज्यातील गडचिरोली, भंडारा, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अमरावती, जालना, ठाणे(अंबरनाथ), पालघरमध्ये या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्याल सुरु करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन महाविद्यालय सुरु होणार आहेत.

Pune News : हल्ला झालेली ‘ती’ मुलगी MPSC करणारी नव्हती, पोलिस उपायुक्तांनी सांगितली खरी माहिती…

एकूण 9 जिल्ह्यांत सुरु होणाऱ्या या महाविद्यालयांमध्ये 430 रुग्णखाटांचं रुग्णालयदेखील सुरु करण्यात मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान, अमरावती आणि वर्धा येथील महाविद्यालयासाठी जागा कालातंराने निश्चित करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत राज्यात 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांच्या प्रवेश क्षमता 3 हजार 750 इतकी असून प्रति एक हजार लोकसंख्येमागे ०.७४ इतके डॉक्टरांचे प्रमाण आहे. तर देशपातळीवर हे प्रमाण ०.९० इतके आहे. या नऊ महाविद्यालयांसाठी ४ हजार ३६५ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Tags

follow us