Pune News : हल्ला झालेली ‘ती’ मुलगी MPSC करणारी नव्हती, पोलिस उपायुक्तांनी सांगितली खरी माहिती…
पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ही मुलगी एमपीएससी परिक्षेची तयारी करीत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या विद्यार्थीनीविषयीची खरी माहिती आता समोर आली आहे. जिच्यावर हल्ला झाला ती मुलगी एमपीएससी परिक्षेची विद्यार्थी नसून इंटेरिअर डिझाईनिंगचा कोर्स करीत असल्याचं पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली आहे.
Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
त्याचं झालं असं की, कनिष्ठ महाविद्यालयात एका शैक्षणिक संस्थेत हल्ला करणारा युवक आणि विद्यार्थीनी दोघेही शिक्षण घेत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आलीय. दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये काही काळानंतर वाद झाले होते. त्यानंतर ही मुलीने पुणे गाठून आपलं शिक्षण सुरु केलं. पुण्यातील एका संस्थेमध्ये ती इंटेरिअर डिझाईनचा कोर्स करीत होती.
PM मोदींचे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; FRP मध्ये घसघशीत वाढ
अगोदर प्रेमसंबंध असलेला तिचा मित्र तिच्यामागे पुण्यात दाखल झाला. त्याने तिच्याशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीकडून वारंवार प्रतिसाद मिळत नव्हता. याचाच राग मनात धरुन युवकाने तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘बावनकुळे स्वतःच भाजपची सी टीम, त्यांच्या हातात काहीच नाही’; राऊतांचा पलटवार
शंतनु जाधव असं हल्ला करणाऱ्या युवकाचं नाव असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या बसमधून मुलगी ग्राहक पेठ येथील थांब्यावर टिळक रोडला उतरली. त्यावेळी शंतनू जाधव तिची वाट पाहत थांबला होता.
बीसीसीआयने पाकिस्तानला दिला मोठा धक्का! आता बाबर आझमची टीम…
तो तरुणीच्या जवळ गेला आणि तिच्याशी वाद घालू लागला. त्यांच्यात झालेल्या वादाच्या कारणावरुन जाब विचारत होता. त्यानंतर तरुणीनं तिच्या मित्राला फोनवरुन याची माहिती दिली. त्यानंतर त्यानं त्याच्या बॅगेतून कोयता काढला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यानं कोयत्यानं वार केलं. त्यानंतर त्यानं मैत्रिणीचा पाठलाग केला होता.
दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलिसांकडून या युवकाला अटक करण्यात आली असून हल्ल्यात मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. या प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्यात येत असून अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.