‘बावनकुळे स्वतःच भाजपची सी टीम, त्यांच्या हातात काहीच नाही’; राऊतांचा पलटवार

‘बावनकुळे स्वतःच भाजपची सी टीम, त्यांच्या हातात काहीच नाही’; राऊतांचा पलटवार

Sanjay Raut replies Chandrashekhar Bawankule : भारत राष्ट्र समितीच्या (BRS) राज्यातील विस्ताराने महाविकास आघाडी आणि अन्य राजकीय नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणारे नेतेही आता पक्षाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. याच टीकेला आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले, बावनकुळेंना इतकं महत्व देण्याची काहीच गरज नाही. ते स्वतःच भाजपची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काहीच नाही. सगळं काही दिल्लीतून ठरवलं जातं. महाराष्ट्रात भाजपाचे नेतृत्व फडणवीस आणि बावनकुळे या दोघांकडेही नाही. के. चंद्रशेखर राव यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले, असा खोचक सवाल राऊत यांनी केला.

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन वाद चिघळला, संभाजी ब्रिगेड आक्रमक

राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी किती टीम करून ठेवल्या आहेत. आता आणखी एक नवीन टीम आली आहे. आधी एमआयएमला बोलावलं होतं. आता केसीआर यांना बोलावलं आहे. पण, महाविकास आघाडी लढाईसाठी सज्ज आहे. आम्ही लढाई लढू आणि जिंकू, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातल्या जनतेचं हित जपावं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी करण्याची त्यांना गरज नाही. तुमचा पक्ष काही राष्ट्रीय पक्ष नाही. शेजारील आंध्र प्रदेशातही नाही. पण आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी मतविभागणी करण्यासाठी तसेच भाजपला मदत करण्यासाठी तुम्हाला सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

बॅंकेच्या प्रत्येक शाखेत देवेंद्र फडणवीसांचे तैलचित्र लावा, सदावर्तेंचे बॅंकेला निर्देश

काय म्हणाले होते बावनकुळे ?

बीआरएसला मतविभागणी करण्यासाठी राज्यात बोलावले आहे अशी टीका ठाकरे गटाने केली होती. त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले होते, की केसीआर यांची महाविकास आघाडीला भीती वाटत आहे. केसीआर यांचं नाव सुद्धा आम्हाला ठाऊक नाही. मग ते आमची बी टीम कसे असतील असा सवाल बावनकुळे यांनी केला होता.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube