बॅंकेच्या प्रत्येक शाखेत देवेंद्र फडणवीसांचे तैलचित्र लावा, सदावर्तेंचे बॅंकेला निर्देश

बॅंकेच्या प्रत्येक शाखेत देवेंद्र फडणवीसांचे तैलचित्र लावा, सदावर्तेंचे बॅंकेला निर्देश

Gunaratna Sadavarte : गेल्या काही दिवसांपासून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या फोटोला पुष्पहार घातला होता. त्यांच्या या कृत्याचा विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला. ही घटना ताजी असतांनाच सदावर्ते यांच्या एका मोर्चात पुन्हा एकदा नथुराम गोडसेचे फोटो झळकले होते. दरम्यान, माध्यमांनी गोडसेचा एकेरी उल्लेख केल्यानंतर सदावर्ते माध्यमांवर चांगलचे भडले. गोडसे याला सन्मान दिला पाहिजे, असं सदावर्ते म्हणाले. यावेळी त्यांनी बॅंक प्रशासनाला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे तैलचित्र लावण्याचे निर्देशही दिले. (Gunaratna Sadavarte said Put oil painting of Devendra Fadnavis in every branch of the bank)

एसटीच्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी (२६ जून) गोडसेचा जयजयकार करणारे पोस्टर फडकवले, त्यांनी गोडसेचा जयजयकार केला होता. त्यानंतर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसांनी या देशात महात्मा गांधींचाचा विचार चालेल. गोडसेचं उदात्तीकरण योग्य नाही, अशा शब्दात सदावर्तेंना फटकारलं होतं. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सदावर्तेंनी आपली भूमिका मवाळ केली. मात्र, आज बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतांना नेहमीप्रमाणे महात्मा गांधींचा उल्लेख बॅरिस्टर एमके गांधी असा केला.

पडद्यावर पुन्हा चालणार कार्तिक-कियारा जोडीची जादू, पहिल्या दिवशी किती कमाई करणार चित्रपट 

दरम्यान, शरद पवार यांनी केलेलं राजकारण बालिश राजकारण होतं. पवारांचे विचार नष्ट करण्याचे काम आम्ही केले. आम्ही शरद पवार नावाचा विषाणू या निमित्ताने संपवला. लवकरच बँकेतून परिपत्रक काढून वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना देण्यात याव्यात. प्रत्येक शाखेत नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस यांची तैलचित्रे लावण्याचे निर्देश सदावर्तेंनी एसटी बँक प्रशासनाला दिले.

परवानगीशिवाय बँकेत बेकायदेशीर पत्रकार परिषद घेतलीच कशी? हे कृत्य बेकायदेशीर असून बँक अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस तक्रार करावी, असे महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube