NIA ने डाव उधळला! खलिपा ‘साकिब’ला अटक, एक गावच ‘अल शाम’ म्हणून घोषित

NIA Raids : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA Raids) मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयसिसशी (Isis) संबंध असलेल्या महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध ठिकाणी एनआयने छापेमारी केलीयं. या छाप्यांमध्ये आयसिसच्या मॉड्युलच्या नेत्याचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. तर इतर सदस्यांना संघटनेसोबत एकनिष्ठ राहण्याबाबतची शपथही दिल्याचं उघड झालं आहे. खलिपा साकिब नाचनला अटक करण्यात आली असून त्यासोबत इतर 15 […]

Isis NIA Raid

Isis NIA Raid

NIA Raids : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA Raids) मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयसिसशी (Isis) संबंध असलेल्या महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध ठिकाणी एनआयने छापेमारी केलीयं. या छाप्यांमध्ये आयसिसच्या मॉड्युलच्या नेत्याचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. तर इतर सदस्यांना संघटनेसोबत एकनिष्ठ राहण्याबाबतची शपथही दिल्याचं उघड झालं आहे. खलिपा साकिब नाचनला अटक करण्यात आली असून त्यासोबत इतर 15 जणांनाही अटक करण्यात आली आहे. एनआयएने केलेल्या या कारवाईमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

IND vs SA : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् रेकॉर्ड्स

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरु असतानाच भिवंडीत छापा मारला. छाप्यात इसिसचा खलिपा म्हणून ओळखला जाणारा साकिब नाचनला अटक करण्यात आली आहे. यासोबतच इतर 15 जणांनाही अटक करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान एनआयएच्या तब्बल 80 जागा दाखल झाल्या होत्या. छाप्यादरम्यान, आरोपींकडून रोख रक्कम, धारदार शस्त्रे, कागदोपत्रे, तसेच मोबाईल फोन्ससह डिजिटल उपकरणं ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई एनआयएने एटीएसच्या मदतीने केली आहे.

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन काँग्रेस पुन्हा आक्रमक; विधानभवनावर धडकणार ‘हल्लाबोल’ मोर्चा

आरोपी साकिब नाचन हा पडघा गावचा खलिफा होता. त्याने पडघा गावाचं नामकरणही केलं होतं. ‘अल शाम’ अस नाव त्याने दिलं होतं. अल शाम म्हणजे मुक्त क्षेत्र असं घोषित करण्यात आलं होतं. इसिस संघटनेचा विविध क्षेत्रात प्रभाव वाढवण्यासाठी तो मुस्लिम तरुणांना प्रोत्साहन देत असल्याचंही उघड झालं आहे.

Government Schemes : महाराष्ट्र मुद्रांक शुल्‍क अभय योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

खलिपा साकिबचं काम कसं चालायचं?
आयसिसचा मॉड्यूलचा नेता साकिब नाचन या कारवाईतील मुख्य आरोपी आहे. तो देशभरातील मुस्लिम तरुणांना संघटनेत सामिल होण्यासाठी प्रवृत्त करीत होता. संघटनेशी एकनिष्ठ राहण्याबाबतची शपथही तो देत होता. काही दिवसांतच त्याला देशात आपलं नेटवर्क उभं करायचं होतं. मात्र, एनआयएकडून आयएसआय महाराष्ट्र मॉड्यूलविरोधात गुन्हा दाखल होता, त्यामुळे एनआयएकडून आयसिसच्या घातपाताचा डाव उधळून लावण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

Exit mobile version