‘ते’ दहशतवादी ‘इसिस’ अन् ‘अल सुफा’शी संबंधित; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा…

‘ते’ दहशतवादी ‘इसिस’ अन् ‘अल सुफा’शी संबंधित; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा…

पुण्यातील कोथरुडमध्ये नाकाबंदीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून माहिती उगळवण्यात एटीएसला यश आलं आहे. हे दोन दहशतवादी ‘इसिस’ आणि ‘अल सुफा’ संघटनेशी संबंधित असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे आता या गुन्ह्याची सुत्रे एटीएसकडून एनआयएकडे जाणार आहेत.

‘MPSCचं वार्षिक बजेट 60 कोटी अन् खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करताहेत’; रोहित पवारांनी पुन्हा ठेवलं बोट

अटकेत असलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचं प्रकरण एनआयएकडे सोपवण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असून उद्या 8 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढव्यात असताना या दहशतवाद्यांनी दुचाकीवर प्रवास करुन शहरातील संवेदनशील परिसरांची ड्रोनद्वारे पाहणी केली होती. जगात घडत असलेल्या दहशतवादी कारवायांचाही त्यांनी अभ्यास केल्याचं समोर आलं आहे.

Shailaja Darade: राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक

जगभरात सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया भारतात देखील करता येईल का, याची चाचपणी त्यांनी केल्याचे ‘एटीएस’ने केलेल्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यांचा ड्रोनच्या माध्यमातून पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट त्यांचा होता का? त्यांनी दुचाकी चोरीचा प्रयत्न का केला? अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात किंवा पुण्यात त्यांचा साखळी स्फोट घडवून आणण्याचा कट होता का?, या बाबी तपासात पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात आहेत.

एटीएसकडून दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सुमारे 500 GB डेटा जप्त करण्यात आला होता. या दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला होता. जप्त केलेला डेटा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (एफएसएल) तपासणीसाठी पाठवण्यात आलायं. डेटामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे ड्रोन व्हिज्युअल आणि विविध ठिकाणांचे Google स्क्रीनशॉट समाविष्ट आहेत. आता या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणाकडून तपास करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube