Shailaja Darade: राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक
Shailaja Darade Arrested : शिक्षक भरतीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त शैलेजा दराडे यांच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दराडे यांना सोमवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. भरतीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी दराडे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दराडे यांना अटक करण्यात आली आहे. (former commissioner of examination council shailaja darade areested by pune police)
‘MPSCचं वार्षिक बजेट 60 कोटी अन् खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करताहेत’; रोहित पवारांनी पुन्हा ठेवलं बोट
डी. एड, बी. एड झालेल्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. शैलजा दराडे या शिक्षण संचालक म्हणून कार्यरत होत्या. 2019 मध्ये त्यांनी राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 लाख ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप होता. ही रक्कम सुमारे पाच कोटी इतकी आहे. त्यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दादासाहेब दराडे मार्फतही ही रक्कम शैलेजा दराडे यांनी घेतली होती.
कोविड घोटाळाप्रकरणी माजी महापौर, अतिरिक्त आयुक्तांनंतर आता BMC चे वरिष्ठ अधिकारी रडारवर
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शिक्षक पोपट सूर्यवंशी यांनी याबाबत पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सुर्यवंशी यांच्या नातेवाईक असलेल्या दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी 14 आणि 12 लाख रुपये दराडे याने घेतले होते.
नोकर भरती होऊनही नोकरी न लागल्याने सूर्यवंशी यांनी दादासाहेब दराडे याच्याकडे पैसे परत मागितले होते. परंतु दादासाहेब दराडे आणि शैलेजा दराडे यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार शैलेजा दराडे व दादासाहेब दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चौकशी झाल्यानंतर शैलेजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे.