कोविड घोटाळाप्रकरणी माजी महापौर, अतिरिक्त आयुक्तांनंतर आता BMC चे वरिष्ठ अधिकारी रडारवर

कोविड घोटाळाप्रकरणी माजी महापौर, अतिरिक्त आयुक्तांनंतर आता BMC चे वरिष्ठ अधिकारी रडारवर

BMC Covid Scam : मुंबई महापालिका कोविड बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी तत्कालिन महापौर, अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची एटीएसकडून चौकशी सुरु असताना मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.(BMC covid scam Kishori Pednekar joint commissioner against fir file senior officers on radar)

फडणवीस मास्टर ब्लास्टर! चौकार, षटकार मारतात अन् विकेटही.., मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

कॅगकडून चौकशी झाल्यानंतर अहवाल समोर आला. त्यातच ईडीने छापेमारी केली. राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील कंत्राटाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. ईडीने कोविड हॉस्पिटल घोटाळा प्रकरणात काहींना अटक केली आहे.

मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील अन् महाडिक 559 कोटींचे लाभार्थी; फडणवीसांनी टाकला होता शब्द

कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेने केलेल्या व्यवहाराची कसून चौकशी सुरु असताना त्यात कोरोना काळात खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आला. त्यामुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉडी बॅग घोटाळा आहे तरी काय?
कोरोना काळामध्ये मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग वाढीव दराने खरेदी करण्यात आल्या. त्याची किंमत 1800 ते 2000 रुपये असताना त्या बॅग 6800 रुपयांना मुंबई महापालिकेने खरेदी केल्या आहेत.

बॉडी बॅग खरेदीचे कंत्राट माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरुन देण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते. मुंबई पोलिसांच्या चौकशीमध्ये किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका टाकून ते कंत्राट एका विशिष्ट कंपनीला देण्यात यावे असे सांगण्यात आले.

असं असलं तरी किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याची टीका केली. महापौरांना याबद्दलचे कुठलेही अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीकडून मुंबई महापालिकेचे मुख्यालय त्यासोबतच मुंबई महापालिकेचे केंद्रीय खरेदी विभाग त्या ठिकाणी जाऊन त्यासोबतच बीएमसी अधिकाऱ्यांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलून या प्रकरणाच्या आणि संबंधित व्यवहाराच्या मुळात जाऊन तपास केला जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube