‘MPSCचं वार्षिक बजेट 60 कोटी अन् खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करताहेत’; रोहित पवारांनी पुन्हा ठेवलं बोट
MPSC चं वार्षिक बजेट 60 कोटी आणि खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा स्पर्धा परिक्षांच्या फीवर बोट ठेवलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीससाहेब फी अन् पेपरफुटी संदर्भात निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी गंभीर झाले तर, या शब्दांत त्यांनी फडणवीसांना इशाराच दिला आहे. राज्यात होणाऱ्या स्पर्धा परिक्षेच्या फीसंदर्भात विधानसभेत रोहित पवारांनी आवाज उठवला होता. विधानसभेत फडणवीसांनी दिलेलं उत्तर समाधानकारक नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी स्पर्धा परिक्षांच्या फीवरुन सरकारला धारेवर धरलं आहे.
७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज
दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये#MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये #seriousness यावा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2023
भरतीसाठी 75 हजार पदांनूसार तब्बल 1500 कोटी रुपये होतात, एमपीएससीचे वार्षिक बजेट 60 कोटी आणि खाजगी कंपन्या 1500 कोटी रुपये फी गोळा करत असल्याचं म्हणत विद्यार्थ्यांमध्ये सिरीयसनेस यावा यासाठीच एवढी 1500 कोटींची वसुली आहे का? असाही सवाल त्यांनी केला आहे.
आम्ही दोघेही एकच, दोन गट असल्याचा पुरावा नाही; शरद पवार गटाचे EC ला उत्तर
दरम्यान, विधानसभेच रोहित पवारांनी फीसंदर्भात उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. फडणवीस म्हणाले होते, 1 हजार रुपयांनी सरकार गरीबही होत नाही अन् श्रीमंतही होत नाही. पण, या परीक्षेत काही गांभीर्य राहावं, गांभीर्याने पाहावं म्हणून आपण परीक्षा शुल्क 1 हजार रुपये ठेवले असल्याचं फडणवीस म्हणाले होते.
https://letsupp.com/maharashtra#google_vignette
त्यावरुन आता पुन्हा एकदा हाच मुद्दा उपस्थित करीत आमदार पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना पवार यांनी परिक्षेच्या पारदर्शकतेवरही बोट ठेवलं आहे. विद्यार्थ्यांनी एवढी फी भरुनही परिक्षा पारदर्शक होईलचं याची हमी आहे का? असा उपरोधिक सवालही पवार यांनी केला आहे.
दरम्यान, फडणवीस साहेब हा विषय खूप सिरीयस आहे, त्यामुळे आपण फी, पेपरफुटीसंदर्भात लवकर निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी जर सिरीयस झाले तर, असा इशाराच रोहित पवार यांनी फडणवीसांना दिला आहे. विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर फडणीसांच्या उत्तराने समाधान झालं नसल्याचं पवार म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्विट करुन त्यांनी विद्यार्थ्यांच्या फीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यावर फडणवीस काय भूमिका मांडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.