Download App

संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात विकासाची गंगा वाहती; प्रचार सभेत बाळासाहेब शिंगाडेंच मत

शहरात झालेली विकास कामे आ.निलंगेकर यांच्यामुळेच झाली आहेत.शहरातील जनतेसाठी आ.निलंगेकर यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा

  • Written By: Last Updated:

Sambhajirao Patil Nilangekar : संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मागील १० वर्षात निलंगा शहरात व मतदार संघात विकासाची गंगा वाहत आहे. या काळात निलंगेकर यांनी शहराचे रूप पालटले आहे. (Sambhajirao Patil) त्यामुळे शहरातील जनता या निवडणुकीत पुन्हा एकदा संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभी आहे, असं प्रतिपादन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रचार सुरू आहे. त्यामध्ये ते बोलत होते.

निलंगा ही क वर्ग नगरपालिका असताना येथे आठवड्यातील सातही दिवस २४ तास पाणीपुरवठा होतो.राज्यातील ही अशी एकमेव नगरपालिका आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी गटारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. निलंगेकर यांच्या नेतृत्वात सर्व जाती धर्मांसाठी सभागृहे व शादीखाना उपलब्ध आहे. शहरातील सामाजिक व जातीय एकोपा टिकण्यासाठी आ. निलंगेकर यांनी प्रयत्न केलेले असल्याचे ते म्हणाले. निलंगा शहराबाबत कोणी कसलाही दावा करू शकत नाही असंही ते म्हणाले.

महायुतीच्या योजनांमुळेच गोरगरिबांचं उत्पन्न वाढलं; संभाजीराव पाटील निलंगेकर

शहरात झालेली विकास कामे आ.निलंगेकर यांच्यामुळेच झाली आहेत.शहरातील जनतेसाठी आ.निलंगेकर यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी काम केले. शहरातील रस्ते,गटारी,पथदिवे, कचरा या संदर्भात नियोजनपूर्वक कामे झाली. त्यामुळे शहरात आज मूलभूत सुविधा संदर्भात समस्या नाहीत. नागरिकांना वेळेवर पाणी मिळते. कुठेही कचरा साठून राहत नाही. रस्त्यावर पथदिवे असल्याने अंधार पडत नाही.यामुळे शहरातील जनता समाधानी आहे असंही ते म्हणाले.

एका बाजुला माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून त्यांना त्यांना मतदार संघात सर्वचस्थरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या बाजूला पत्नी सौ प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर, वहिनी सौ, डॉ समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर, व बहीण सौ प्राजक्ताताई मारवा निलंगेकर यांनी महिला वर्गात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, महिला वर्गात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडत ते प्रश्न सोडविण्यासाठी शब्द मिळत असल्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पैसे डायरेक्त खात्यावर जमा झाल्यामुळे, महिला वर्गात महायुती शासनाचे व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत, प्राजक्ताताई मारवा निलंगेकर म्हणतात आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकरांची मी एकटीच बहीण नाही तर लाखापेक्षा अधिक बहिणीचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी आहे असे त्या सांगतात. पत्नी प्रेरणाताई महिलांशी संवाद साधताना सांगत आहेत.

follow us