Download App

धन्यवाद दादा! तुम्ही कितीही आक्रमक बोलले तरी माझ्याविषयीचं तुमचं प्रेम कमी होणार नाही

अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.

Nilesh Lanke Tweet on Ajit Pawar : निलेश लंके तु किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके (Nilesh Lanke ) यांनी ट्वीट करत जोरदार उत्तर दिलं आहे. निलेश लंके यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये अजित पवार यांचे आभार मानत खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध निलेश लंके असा हा सामना राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

 

लंकाच पेटवत चाललाय

निलेश लंके यांनी अजित पवार यांचेच काही व्हिडीओ क्लिप एकत्र करून एक व्हिडीओ बनवला आणि तो पोस्ट केला आहे. त्यात अजित पवारांनी निलेश लंकेंबाबत पूर्वी केलेली विधानं आहेत. यामध्ये ‘निलेश लंके तर लंकाच पेटवत चाललाय सगळी. करोना जबरदस्त होता, निलेशनं स्वत: रुग्णांची मोठी व्यवस्था केली होती. या गड्याची अंगकाठी बारीक आहे, पण अक्षरश: कष्ट घेत होता, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यावेळी लंके यांचं कौतूक केलेलं आहे. ते लंके यांनी ट्विट केलं आहे.

 

मी माझं कर्तव्य मानतो

पुढे सर्व 288 आमदारांमध्ये जागरुक लोकप्रतिनिधी कसा असावा, असं विचारलं तर निलेश लंके हे उत्तम उदाहरण आहे असंही अजित पवार लंके यांच्याबद्दल बोललेले आहेत. तसंच, निलेश लंकेसारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला पाठबळ देणं हे मी माझं कर्तव्य मानतो. निलेश लंके आधुनिक श्रावणबाळ आहे, असंही अजित पवार म्हणाले यामध्ये म्हणालेले आहेत. ही व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

काय म्हणाले लंके

या व्हिडीओसह लंके यांनी अजित पवारांना उद्देशून एक खोचक पोस्टही हिली आहे. लंके म्हणाले, धन्यवाद दादा…तुम्ही माझ्याविषयी नगर दक्षिण मतदारसंघात येऊन कितीही आक्रमक बोललात, तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारं हे खरं प्रेम कधीही कमी होणार नाही’, अशा खोचक शब्दांत लंकेनी पवारांची चांगलीच फिरकी घेतील.

follow us