Nilesh Lanke : बांगलादेशमधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार सुरू असून सनातन धर्माविरूध्दच्या कथित कटाचा भाग म्हणून जाणीवपुर्वक मंदिरे आणि हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे नमुद करून खा. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला आहे. तसे निवेदन खा. लंके यांच्यावतीने जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांना देण्यात आले आहे.
यासंदर्भातील निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बांगलादेशातील (Bangladesh) हिदू धर्मीयांवर मोठया प्रमाणात अत्याचार सुरू असून काही दिवसांपासून हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. बांगलादेशातील अध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना नुकतीच अटक करून त्यांना तुरूंगात डांबण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. जगामध्ये कोठेही हिंदू धर्मीय किंवा अल्पसंख्यांक धमयांवर होणारा अत्याचार हा अत्यंत चुकीचा असून मानवता धर्म जोपासण्यासाठी महाराष्ट्र व भारत सरकारने यासाठी तातडीने पावले उचलून बांगलादेशमधील हिंदू धमयांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व स्तरांवरून होत असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
स्थलांतरित कामगारांसाठी रोजगाराच्या संधीसाठी का काम करत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे की, हिंदू धर्माने समस्त जगाला मानवतेचा धर्म शिकविला आहे. अत्यंत सहिष्णू असणाऱ्या हिंदू धर्माबाबत बांगलादेशमध्ये मात्र कटटरतावादी धार्मिक व्देषभावना निर्माण करून तेथील स्थानिक हिंदूंचा छळ करत असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर शहरात सकल हिंदू समाजातर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झाली.
मामांची हत्या…योगेश टिळेकरांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, पोलीस यंत्रणा…