बापुसाहेब हे सामान्यांचे आधार, वडगाव शेरीचा चेहरा मोहरा बदलेन : खासदार नीलेश लंके
Bapusaheb Pathare : वडगाव शेरी मतदार संघाचे महविकास आघाडीचे (MVA) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या प्रचारासाठी आयोजित परिवर्तन महासभेत अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घणाघाती भाषण करुन पठारे यांच्या विजयाचे आवाहन केले. 50 हजारांनी ते निवडून येतील, हे विश्वासाने सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. संविधानाची प्रत पठारे यांना भेट देण्यात आली. अनेक व्यक्ती, संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिले. वडगाव शेरी हा मिनी इंडिया असून तो आदर्श करु, अशा भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. मारुती गलांडे यांनी आभार मानले.
नीलेश लंके म्हणाले,या परिसराचे परिवर्तन बापूसाहेब पठारे यांनी केले. विकास केला. संकट समयी आधाराचे केंद्र बापूसाहेब पठारे यांनी निर्माण केले. नगरचे नागरिक येथे मोठया प्रमाणावर मतदार आहेत. ते तुतारी लाच मतदान करतील. खरे कार्यसम्राट बापूसाहेब आहेत, सामान्यांचे ते आधारवड आहेत.
शरद पवार यांना झालेल्या त्रासाची भरपाई केली पाहिजे. सत्तारूढ लोक लबाड आहेत, महविकास आघाडी सत्तेवर येणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. पुढे शेतकरी, महिला, बेरोजगार वर्गासाठी काम करु. असं नीलेश लंके म्हणाले.
तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर …, नाशिकमध्ये राज ठाकरे स्पष्टच बोलले
बापूसाहेब पठारे म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार खोटारडा आहे . त्यांनी 10 कोटीची कामे दाखवावी,1500 कोटीची भाषा करु नये. पवार साहेब हे आमचे दैवत आहे. टँकर वापरल्याचा आरोप करणाऱ्यांनी पाण्याचा कधीच प्रश्न सोडवला नाही. आपण जिंकणार आहोत आणि चांगले परिवर्तन या मतदारसंघात घडवणार आहोत.
Bapusaheb Pathare : बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीमध्ये महिलांचा झंझावात