तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर …, नाशिकमध्ये राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray On Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचार सभेच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. यातच आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिकमध्ये (Nashik) मनसेच्या उमेदवारांसाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.
या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी पाच गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितल्या होत्या आणि त्या माझ्या हिताच्या नव्हत्या. मी मागील वेळी मराठी भाषाला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली होती. आता तो दर्जा मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. यामुळे कधी कधी ऊर भरून येतो. तुम्ही कधीतरी विचार करून बघा. धत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीराव फुले जी भाषा बोलत होते, ती भाषा आपण बोलतो, त्याचा आपल्याला अभिमान वाटला पहिजे. असं राज ठाकरे म्हणाले.
या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राज ठाकरे म्हणाले की, 2019 मध्ये मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर म्हटलं असतो, मी तुमच्या बरोबर येतो पण मी सांगेन त्या गोष्टी राज्यात झाल्या पाहिजे. त्यातील अनेक गोष्टीत आहेत. मुंबई – नाशिकच्या रस्ताचा त्यात समावेश आहे.
Bapusaheb Pathare : बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीमध्ये महिलांचा झंझावात
आज पुण्यात इतके उद्योग आले आणि त्यामुळे रस्ते चांगले झाले. नाशिकमधील या मतदारसंघाला उद्योगनगरी म्हणतात. कारण इतके उद्योग मतदारसंघात आहे पण काही उद्योग बंद झाले आहे आणि त्यामुळे आज अनेक लोक बेरोजगार झाले. उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी तसं वातावरण लागतं. असं देखील या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व तुळशी विवाह संपन्न