शिक्षण, महिला, रोजगार ते गडकिल्ले; मनसेकडून जाहीरनामा प्रसिद्ध, काय म्हणाले राज ठाकरे?
MNS Manifesto : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. (MNS) यावेळी मनसेनेही जोरदार प्रचार सुरू केलाय. आज महाराष्ट्र नवरनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘आम्ही हे करु’ नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज ठाकरेंची महायुतीसोबत जाण्याबद्दल मन की बात, म्हणाले, मी पूर्वीपासून भाजपसोबत
अनेक पक्षाचे जाहीरनामे आले, अनेक पक्षांनी आपल्या योजना त्या जाहीरनाम्यात दिल्या आहेत. जाहीरनाम्याच्या किती प्रती छापल्या याची आयोगाकडून विचारणा. १७ तारखेला शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला परवानगी अद्याप मिळालेली नाहीय. अनेकांनी आपल्या जाहीरनाम्यात काय करु ते दिलंय. पण आमच्या जाहीरनाम्यात काय करु आणि कसं करु ते याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. सर्व प्रचारात व्यस्त असल्याने कुणाला बोलावलं नसल्याचंही राज यांनी यावेळी सांगितलं आहे.
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द
राज ठाकरे यांनी 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना अद्याप या सभेसाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी मी मुंबई आणि ठाण्याच प्रचार करेन, असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यात काय काय?
भाग १
मुलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला
कायदा सुव्यवस्था, आरोग्य क्रिडा, बालसंगोपन
प्राथमिक शिक्षण आणि रोजगार, उच्च शिक्षण
औद्योगिक धोरण, प्रशासन आणि मराठीचा
सन्मान
भाग २
दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा,
पर्यावरण इंटरनेट
भाग ३
प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण,
आर्थिक धोरण, कृषी पर्यटन
भाग ४
मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर,
डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन
पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.