उद्धव ठाकरेंना लोकसभेच्या पराभवाची सल कायम; म्हणाले, ..तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील (Uddhav Thackeray) छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता इतर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झाला होता. छत्रपती संभाजीनगरचा पराभव हा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतय.
नुकतीच शिवसेनीच छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे यांनी जनतेला भावनिक आवाहन केलं. ‘मोदी आणि शाह हे मला घरी बसवू शकत नाहीत. पण जेव्हा जनता ठरवेल, तेव्हा मी घरी बसेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद) हा फार पूर्वीपासून शिवसेना पक्षाचा गड राहिला आहे असंही ते म्हणाले आहेत.
सिल्लोडमधील गुंडागर्दी संपवण्यासाठी;गद्दाराला पाडा; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आवाहन
यावेळी लोकसभेत इथे शिवसेना (शिंदे) पक्षाचे संदीपान भुमरे यांचा विजय झाला. छत्रपती संभाजीनगर लोकसभेत जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि वैजापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ येतात. उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी भावनिक आवाहन करून जनतेला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यात होत आहे. लोकसभेत दुर्दैवाने आमचा पराभव झाला. तो कसा झाला आणि का झाला? याचं उत्तर कोण देणार? मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी प्रामाणिकपणे केलेला कारभार तुम्हाला आवडला नाही का? माझं नेतृत्व तुम्हाला पसंत नाही का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला.