Nilesh Lanke slams those who troll Indurikar Maharaj, suggestive statements on Ajit and Sharad Pawar : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या झालेल्या युतीवर चर्चा सुरू आहे. त्यावरून आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील या युतीबाबत सूचक विधान केलं आहे. तसेच यावेळी लंके यांनी किर्तनकार इंदुरीकर महाराजांना त्यांच्या लेकीच्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.
काय म्हणाले निलेश लंके?
राजकारण विरहीत भावना आहे की, ठाकरे,पवार कुटुंब एकत्रित राहिले पाहिजे,सगळे परिवार एकत्रीत राहिले पाहिजे. कुटुंबा पलीकडे हे एकत्रित आले तर आनंद आहे आम्हाला,पवार साहेब,ताई यांना आहे. कार्यकर्त्यांनी असे मोठ्या नेत्यावर बोलायचे नाही. विखे राज्याच्या राजकारणात मोठे कुटुंब आहे, मी बोलण योग्य नाही. मोठ्या लोकांवर बोलत नाही, टाळतो ,मोठ्यांचा आदर करतो.
‘जिप्सी’ च्या खास प्रदर्शनाला हाऊसफुल्ल प्रतिसाद; सह व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली विशेष मुलाखत
मी व्यक्तिगत कधीही विखे यांच्यावर बोललो नाही. बिहार निवडणूक कशामुळे बिघडली का यावर मी विचारणार त्या ठिकाणच्या खासदार यावर, बिहार आणि महाराष्ट्र यात अंतर आहे. सर्व समावेशक उमेदवार असेल शाहू फुले आंबेडकर यांना घेऊन काम करत असेल. तर सोबत जाऊ. दादासाहेब चुलते पुतणे आहेत. ते निर्णय घेतील. हे कार्यकर्ते पाळत असतात. जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याचे कौटुंबिक आहे. वोटचोरी सगळीकडे झाली. माझ्याकडे काय माझ्याकडे 50 हजार चोरी विधानसभेला झाली. लोकसभेला मोठी संख्या असते. असं म्हणत त्यांनी अजित आणि शरद पवार एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
अनेकजन गुडघ्याला बाशिंग बांधून असताना जागा राखीव, बीडमध्ये नेत्यांचे डाव प्रतिडाव
तर इंदुरीकरांवर बोलताना ते म्हणाले की, इंदुरीकर महाराज समाज प्रबोधन करत असतात. त्याच्यावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही. अनेक लोक जोडले जातात. चांगले करणे भाग आहे. महाराजांवर टीका करणे योग्य नाही. त्यांनी प्रबोधन केले ते कर्ज काढून रीन करू नका. असे म्हणणे आहे,त्याची आर्थिक परस्थिती चांगली आहे. अनेक उद्योजक राजकीय लोक लग्न केले. त्यावर नाही बोलत कोणी समाजशी बांधिलकी आहे. महाराज यांनी लग्न मोठे केले म्हणजे काय केले. तेवढी लोक येणार त्याच्या तरी चर्चा होईल, चुकीचे समर्थन करत नाही.
