रत्नागिरी : गुहागरमध्ये मला बोलवत जा, 2024 ची मॅच मला जिंकायची असल्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केला आहे. किती मागावं सरकारकडे कुठला प्रस्ताव द्यावा, त्याच्यावरती सांगितलं. की काही दिवसापूर्वी संगमेश्वरमध्ये (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial ) छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावं, आम्ही तिथे बलिदान दिवस साजरा केला आणि तो साजरा करत असताना मला सांगण्यात आलं स्मारकासाठी कोणतरी १० कोटीचा प्रस्ताव घेऊन आला, मी म्हणतो की ते १० कोटी ठेव बाजूला मला पाहिजेच आहे, तर ते ५०० कोटी पाहिजे १० कोटीत आपलं काही होत नाही.
मुंबईमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक (Balasaheb Thackeray Memorial) होत आहे, तिथं साडे तीनशे कोटी, बाबासाहेब आंबेडकर ७५० कोटी, आणि सुरुवात १० कोटी ते संभाजी महाराजांसाठी ते नको, आम्हाला मिळाले तर ५०० कोटींचं मिळालं पाहिजे, नाहीतर नको आम्हाला.
आणि म्हणून शिडके साहेब आम्ही तुम्हाला सांगतो, मराठा भवन उभा करायचा असेल तर सर्वात मोठा योगदान राणेंचा असेल, कारण आपण कधी चिरीमिरी काम केलेच नाही कधी, हात टाकला तर डायरेक्ट कॉलरवरच नाहीतर नाही. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. महाराष्ट्रभर मराठा भवन उभा राहील पाहिजे, त्याच्यासाठी सरकार आपलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मराठा आहेत, प्रस्ताव असे तयार करू, पाठपुरावा आमच्यासारखे लोक करतील. पण महाराष्ट्रभर मराठा भवन प्रत्येक जिल्ह्यात उभारला पाहिजे, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. क्रिकेट तसा माझा आवडीचा विषय आहे, आज मी राजकारणी झालो नसतो तर मी शंभर टक्के क्रिकेटर झालो असतो असे त्यांनी यावेळी म्हणाले.