Karale Guruji : शरद पवारांचा मोठा निर्णय; नितेश कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

Karale Guruji : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक नेते नितेश कराळे गुरुजी यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Karale Guruji

Karale Guruji

Karale Guruji : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक नेते नितेश कराळे गुरुजी यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर दुसरीकडे भाजपकडून या निवडणुकीसाठी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र कराळे गुरुजी यांनी या निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

माहितीनुसार, कराळे गुरुजी (Karale Guruji) मागच्या निवडणुकीत देखील या मतदारसंघातून (Nagpur Division Graduates Constituency) अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना साडेआठ हजार मते मिळाली होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या निवडणुकीत देखील त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाचा आदेश पालन न केल्याने पक्षातून त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्के म्हणाले, भाजप प्रवक्त्या…

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council Election) महाविकास आघाडीचे (MVA) अधिकृत उमेदवार म्हणून अभिजीत गोविंदराव वंजारी हे निवडणूक लढवित आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी काम करणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नैतिक व राजकीय जबाबदारी आहे. परंतु, आपण पक्षाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला पाठिंबा आहे अशा प्रकारचा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करीत असल्याने पक्षातून तुमची 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version