‘घड्याळ चोरणाऱ्यांचं घड्याळ 10 : 10 वाजता बंद पडणार’; कराळे गुरुजींच्या निशाण्यावर अजितदादा!

‘घड्याळ चोरणाऱ्यांचं घड्याळ 10 : 10 वाजता बंद पडणार’; कराळे गुरुजींच्या निशाण्यावर अजितदादा!

Karale Guruji On Ajit Pawar : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha) महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अहमदनगर शहरात जाहीर सभा घेतली . यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) , माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कराळे गुरुजी (Karale Guruji) उपस्थित होते.

या सभेत बोलताना कराळे गुरुजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. कराळे गुरुजी म्हणाले, मणिपूरमध्ये दंगली होत होते, या दंगलीमध्ये अनेक लोकांचा मुत्यू झाला. मोठ्या प्रमाणात सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये गेले नाही 2 महिन्यानंतर फक्त 26 सेंकंद मणिपूरबद्दल बोलले आणि आज भाजप म्हणत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन आणि रशियामधील युध्द थांबवले.

भाजप सरकार शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत आहे. गुजरातचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीसाठी परवानगी नाही. आता परवानगी दिली मात्र कांदा निर्यातीबद्दल अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहे. या लोकांनी बाळासाहेबांचा पक्ष फोडला नंतर शरद पवारांचा पक्ष फोडला. यामुळे भरपूर मतदान करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करा.

अजित पवार यांच्यावर टीका करत कराळे गुरुजी म्हणाले, 4 जून रोजी ज्याने घड्याळ चोरून नेला त्याचे घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडले पाहिजे. घड्याळाची चावी फक्त शरद पवार यांच्याकडे आहे. असं कराळे गुरुजी म्हणाले.

आता काँग्रेससोबतची युती तोडणार का? पित्रोदांचं ‘ते’ विधान अन् मोदींचं स्टॅलिन यांना चॅलेंज…

मुकेश अंबानी- गौतम अडाणी यांच्या 10 लाख 34 हजार कोटींची कर्ज माफी मोदी सरकारने केली मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांच्याकडे पैसे नाही असं कराळे गुरुजी म्हणाले. मोदी सरकारने 400 रुपयांचा गॅस सिलिंडर 1000 रुपयांवर नेले , मोदी सरकार गरिबांचे हाल करत आहे असं देखील या सभेत बोलताना कराळे गुरुजी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube