Download App

सत्यजीत तांबेंच्या आमदारकीला 100 दिवस पूर्ण; असे बनवले काँग्रेस, भाजपाला ‘मामा’

Satyajit Tambe’s MLA completes 100 days : काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निडणुकीची राज्यात सर्वाधिक चर्चा झाली होती. त्यांच कारण म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवा नेते सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीने. सत्यजीत तांबेंनी नाशिक पदवीधरची निवडणूक गाजवली, लढवली आणि जिंकली. आता सत्यजीत तांबेंचा विधान परिषद सदस्यत्वाचा शंभर दिवसांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने सत्यजीत तांबेच्या मित्रांनी त्यांना खास सरप्राईज दिलं. याबाबतची एक पोस्ट तांबेंनी शेअर केली आहे.

खरं तर या चर्चेची सुरुवात झाली सत्यजीत तांबे यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यापासून. त्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबेमध्ये क्षमता असून त्यांना जास्त वेळ दूर ठेऊ नका, अशा लोकांवर आमची नजर असते असं बाळासाहेब थोरातांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून भाजपकडून सत्यजीत तांबेंना उमेदवारी भेटलं याची चर्चा सुरु झाली होती.

त्यानंतरच्या काळात विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे काही वरिष्ठ नेते सत्यजीत तांबेंच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. अजित पवार यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला होता. दरम्यानच्या काळात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा अपघात झाल्याने त्यांना दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. काँग्रेसच्या वेळकाढू भूमिकेमुळे तांबेंच्या उमेदवारीचा गुंता सुटला नाही आणि तांबेंना उमेदवारीसाठी ताटकळत ठेवण्यात आले.

सत्यजीत तांबे यांनी पदवीधर निवडणुकीची पूर्ण तयारी केली असताना देखील काँग्रेसने एबी फॉर्म मात्र त्यांच्या वडिलांना सुधीर तांबे यांना देण्यात आला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही. त्यांच्याऐवजी सत्यजीत तांबेंनी अर्ज भरला. फॉर्म भरुन बाहेर आल्यानंतर आपण भाजपचा देखील पाठिंबा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता-पुत्रांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली. नाशिक पदवीधरची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला सोडली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला.

शिंदेंच्याऐवजी बावनकुळेंनी घेतली विखेंची बाजू; म्हणाले, त्यांचे आरोप गैरसमजातून

नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार उभा केला नव्हाता. त्यामुळे सत्यजीत तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता ही गोष्ट लपून राहिली नव्हती. भाजपने तांबेच्या मागे सगळी ताकत लावली होती. नगर जिल्ह्यातील भाजप नेते राधाकृष्ण विखे हे आपल्या बंधुच्या उमेदवारीसाठी आग्रही होते पण पक्षाचा वरुन आदेश आल्याने त्यांनी माघार घेतली. पण तांबेंना पाठिंबा द्यायचा की नको यावरुन मात्र ते शेवटपर्यत संभ्रमात दिसून आले. पण मतदानाच्या शेवटच्या दिवशी संकेतीक शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला होता.

Devendra Fadnavis : एक निर्णय बैलगाडा शर्यतीसाठी ठरला वरदान; फडणवीसांनी दिलेल्या ‘त्या’ अहवालात काय होते?

बाळासाहेब थोरात यांनी प्रत्यक्ष सत्यजीत तांबे यांचा प्रचार केली नाही. पण नगर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांचा प्रचार केला. नाशिक पदवीधर मतदारसंघात संपूर्णपणे नाट्यमय घाडामोडी घडत होत्या. सत्यजीत तांबेंनी कोणत्याही वादावर थेट प्रतिक्रिया देण टाळलं होतं. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते टिकून राहिले होते. पिता-पुत्रांनी कार्यकर्त्यांच्या भेटीवर भर दिला होता. सुधीर तांबे हे सलग तीन टर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार असल्याने त्यांचा मतदारांवर प्रभाव होता. सत्यजीत तांबेंनी सोशल मीडियासह अन्य निवडणूक साधनांचा योग्य नियोजन, अचून व्यवस्थापन करत विजय मिळविला होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज