शिंदेंच्याऐवजी बावनकुळेंनी घेतली विखेंची बाजू; म्हणाले, त्यांचे आरोप गैरसमजातून
Chandrashekhar Bawankule On Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातही आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
तसेच पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी या बैठकीत कुणाला कोणती जबाबदारी मिळते ते पाहणे देखील महत्वाचे राहणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बोलताना भाजपचे नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे नेते व माजी मंत्री राम शिंदे यांच्यातील वादावर भाष्य केले आहे.
Sanjay Raut : जे.पी. नड्डांचा मुंबईशी काय संबंध? उगाच लुडबुड करु नये
एखाद्या विषयामध्ये मतमतांतर होऊ शकतं. त्याला संपूर्ण गटबाजी म्हणत नाही. स्थानिक पातळीवरील तो विषय आहे. मी तो पूर्णपणे सोडविला आहे. एवढा काही त्याच्यामध्ये बाऊ करुन घ्यायची गरज नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर काही उत्तर दिले नाही. त्यांचा जो गैरसमज झाला होता तो त्यांनी रात्री चर्चा करुन संपवला. गैरसमज झाल्यावर व्यक्ती रागामध्ये बोलतो. हे गैरसमजातून झालं होतं. नंतरच्या काळामध्ये मी चर्चा करुन यावर बोललो आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
नेमके काय आहे वादाचे प्रकरण
जामखेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड झाली. त्यात ईश्वरचिठ्ठीने शिंदे गटाचे शरद कार्ले हे सभापती झाले. तर आमदार रोहित पवार यांच्या गटाचा ईश्वरचिठ्ठीने उपसभापती झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले होते. विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.
9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा
शिंदे म्हणाले होते, उपसभापतीपदाला सचिन घुमरे यांचा पराभव झाला असला तरी सभापती आमचा झाला. त्यामुळे ही बाजार समिती आमच्या ताब्यात आली. खासदार सुजय विखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यांचे सहकार्य अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. विखेंचे पीए आणि त्यांच्या बंधूंनी विरोधात फॉर्म भरला. विखेंनी एक कार्यकर्ता विरोधात उभा केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता.
यावर राधाकृष्ण विखेंनीही उत्तर दिले होते. आमदार राम शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गैरसमजुतीतून आरोप केले आहेत. वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांचे थेट माध्यमांशी बोलणे उचित नाहीत. हा पक्षातंर्गत विषय आहे. तो पक्षातंर्गत सोडविला पाहिजे, असेही विखे यांनी म्हटले आहे. राम शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केल्यास आम्ही पक्ष नेतृत्वाला उत्तर देऊ, असे विखे म्हणाले होते.