Download App

धक्कादायक! पोलिसांत तक्रार केल्याने जातीतूनच बहिष्कृत, 22 पंचांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News : आपल्या लेकीला नांदवण्यास सासरच्या लोकांकडून नकार देण्यात आल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र या कारणास्तव जात पंचायतीने थेट मुलीच्या कुटुंबाला समाजातूनच बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला व त्यांना तब्बल तीन लाखांचा दंड देखील ठोठावला. ही धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे.

दरम्यान या धक्कादायक प्रकरणी मुलीचे वडील मोहन भगवान चव्हाण (वय-50 रा. आरोळे वस्ती जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २२ जणांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संबंधित सर्व आरोपी फरार झाले आहेत. मात्र या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खबल उडाली आहे.

Baipan Bhaari Deva मधील शशी फेम वंदना गुप्तेंना अटक? नेमकं प्रकरण काय?

दाखल फिर्यादीत म्हंटले आहे की, माझी मुलगी पुजा हिचा 2018 रोजी सासवड येथील रमेश साहेबराव शिदें या तरूणाशी विवाह झाला होता. मात्र दोन वर्षानंतर पूजाला तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरी आणून सोडले व तिला नांदवण्यास नकार दिला होता. याबाबत मी मोहन चव्हाण कर्जत येथील भरोसा सेल कडे तक्रार दाखल केली होती. परंतू त्यानंतर पुजा हिच्या सासरच्या मंडळींनी सदरचे प्रकरण जात पंचायत बसवून मिटवू असे सांगितले.

नगरमधील जागा ताबा प्रकरण : एका बांधकाम व्यावसायिकासह पाच जणांविरोधात अखेर गुन्हा

जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथे एप्रिल २०२३ मध्ये 22 पंच न्यायनिवाड्यासाठी बसले. पंच मुलीच्या वडिलांना म्हणाले तुम्ही या प्रकरणी पोलीस ठाण्यात पोलासात तक्रार का दाखल केली. तुम्हाला 03 लाख रुपये दंड भरावा लागेल तसेच असे न केल्यास तुम्हाला समाजातून बहिष्कृत करू असा निर्णय दिला. दरम्यान याप्रकरणी यावेळी फिर्यादी मोहन चव्हाण यांनी जामखेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून २२ पंचाविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व सर्व आरोपी फरार आहेत. पोलीस निरीक्षक महेश पाटील सदर घटनेचा तपास करीत आहे.

Tags

follow us