नगरमधील जागा ताबा प्रकरण : एका बांधकाम व्यावसायिकासह पाच जणांविरोधात अखेर गुन्हा
Ahmednagar Crime : शहरात मोकळ्या जागेवर ताबा घेण्याच्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन अमित पटवारी (रा. जालना) यांच्या फिर्यादीवरुन शहरातील बांधकाम व्यावसायिक निर्मल मुथा (Nirmal Mutha)यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटवारी यांनी आपल्या 30 गुंठे जागेच्या सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत तोडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक(District Superintendent of Police) व कोतवालीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime land grab Finally, a case registered against five people including a builder )
आता भुजबळांच्या कशाला काय लावून बसलात? उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना सवाल
पटवारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमची शहराच्या माळीवाडा, येथील गट नं. 8/12 व 9/3 भवानीनगर जवळ वाकोडी रोड, भोसले लॉनच्या अलीकडे 30 गुंठे जागेच्या प्लॉटवर 6 जुलै रोजी माझे वडिलांचे मित्र जाकीर हुसेन नसीर पठाण यांच्याकडून पक्के सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत बांधून घेतली होती. सदर प्लॉटवर मी अधून-मधून येत असतो. 7 जुलै रोजी आपण वडील अमित शशिकांत पटवारी जालना येथून सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास आमच्या जागेची पहाणी करण्यासाठी आलो होतो.
राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा अहवाल समोर
त्यावेळी जागेवर बांधलेली सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत पूर्णपणे पाडल्याचे दिसून आले. त्यावेळी मी व माझे वडिलांनी आजूबाजूला चौकशी केली असता, आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, निर्मल मुथा आणि इतर चार-पाच लोक सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जेसीबी घेऊन आले होते. त्यांनी तुमचे सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचे सांगितले. या प्रकरणात सदर जागेची संरक्षक भिंत जेसीबीने पाडून बळजबरीने ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीत पटवारी यांनी म्हटले आहे.
पटवारी यांनी सदर जागेवर बांधलेली संरक्षक भिंत जेसीबीद्वारे तोडून, राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींकडून दहशतीने जागा बळकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी खुलासा करुन याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. पटवारी यांच्या 30 गुंठे जागेवर असलेली सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून त्यांचे नुकसान करुन अतिक्रमणाद्वारे बळजबरीने बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सबंधितांवर भा.दं.वि. 427, 447, 511 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.