राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा अहवाल समोर

राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा अहवाल समोर

Maharashtra School News : यावर्षी पासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षणामध्ये मोठे बदल केले आहेत. पाठ्यपुस्तके, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र या दरम्यान राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालायाने जारी केला आहे. ( Decrease of Maharashtra School Education Standard in Education Ministry Education performance grading 2.0 )

आता भुजबळांच्या कशाला काय लावून बसलात? उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना सवाल

काय आहे हा अहवाल?

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण व्यवस्थेची जिल्हानिहाय कामगिरीची वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा अहवाल जारी केला आहे. ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0’ असं या अहवालाचं नाव आहे. 2020-21 आणि2021-2022 दोन वर्षांसाठीचा हा अहवाल आहे. या अहवालामध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत निराशाजनक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला आहे.

Udhav Thackeray : मर्दाची औलाद असाल तर तुम्ही.., उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट मैदानातच बोलवलं

या अहवालामध्ये एकूण 73 निकषांवर शालेय शिक्षण व्यवस्थेच्या जिल्हानिहाय कामगिरीचं मूल्यमापन करण्यात आलं. निष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापन या दोन गटांत या निकषांना विभागण्यात आले आहे. यामध्ये तब्बल 14 लाख 90 हजार शाळा, 95 लाख शिक्षक आणि विविध अर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर असेलल्या 26 कोटी 50 लाख विद्यार्थी असलेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

कोणत्या आधारे केले मूल्यमापन?

मिळालेले एकूण परिणाम, वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची परिणामकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि प्रशासकीय प्रक्रिया या मुद्द्यांच्या आधारे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण व्यवस्थेची जिल्हानिहाय कामगिरीचं मूल्यमापन केलं आहे. त्यामध्ये राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube