Download App

कर्जवसुलीसाठी बॅंकेने छळलं, ‘त्याने’ आयुष्यच संपवलं; वसंत मोरेंच्या नावे लिहिली चिठ्ठी

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : अहमदनगर तालुक्यात एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात बँक कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे. शिवाय, या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळं सर्वच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मोहन आत्माराम रक्ताटे (Mohan Atmaram Raktate) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

राणेंनी सलिम कुत्तासोबत व्हिडिओ दाखवला, पण अंधारेंनी पिक्चरच दाखवला 

मोहन यांनी खासगी बँकेतून कर्ज घेऊन माल वाहू टेम्पो घेतला होता. मात्र, दोन आठवडे कर्ज थकीत असल्याने संबंधित बँकेने आपला टेम्पो जमा केला आणि परस्पर विकला. कोणतीही सूचना न देता बॅंकेने टेम्पो विकल्यानं आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्यानं मोहन यांनी रविवारी (10 डिसेंबर 2023) रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली होती. हे चिठ्ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने होती. माझे दोन हफ्ते थकल्यानं संबंधित बॅंकेने माजा टेम्पो जमा करून कोणतीही नोटीस न पाठवता परस्पर विकाला. वसंत मोरेच मला न्याय मिळवून देतील, असं चिठ्ठीत लिहिलं आहे.

तळवडे दुर्घटनेत कारवाईचा फास आवळला; रेड झोनबाबतही बैठक घेणार : फडणवीसांची ग्वाही 

मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यातील गुगळे कॉलनी बुऱ्हाणनगर येथील मोहन रक्ताटे यांनी २०२२ मध्ये बँकेकडून कर्ज घेऊन मालवाहतूक टेम्पो खरेदी केला होता. यानंतर मोहन यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि महिनाभरातच टेम्पोचा अपघात झाला. दुरुस्तीच्या कामामुळे दोन महिने टेम्पो तसाच जागेवर होता. परिणामी, ते ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बँकेचे हप्ते भरू शकले नाहीत. यानंतर बँकेने मोहन यांचा टेम्पो जमा केला. टेम्पो विकून उर्वरित हप्ते देण्याचा मोहन यांचा विचार होता. मात्र, त्यांचे आणि बँकेचे व्यवहार जुळले नाहीत. त्यानंतर त्यांनी मित्राकडून पैसे घेऊन संपूर्ण कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी त्यांनी पुन्हा बँकेशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांची गाडी बँकेने विकल्याचे त्यांना सांगण्यात आले. कोणतीही माहिती न देता माझी गाडी का विकली? असा सवाल रक्ताटे यांनी केला. त्यावरून रक्ताटे आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. दरम्यान, जातीवाचक शिवीगाळ करून दम दिला, त्यामुळं मी आत्महत्या करत आहे, अशी माहिती सुसाईड नोटमध्ये लिहिलेली आहे. तसंच पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे हेच आपल्याला न्याय देऊ शकतात, असं चिठ्ठित लिहिलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच वसंत मोरेंनी रक्ताटे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. खासगी बँकेच्या जाचाल कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मोरे यांनी केली. जर गुन्हे दाखल झाले नाही तर मनसे स्टाईल हिसका दाखवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Tags

follow us

वेब स्टोरीज