लॉजमध्ये वेश्याव्यवसाय : वसंत मोरे विरोधात उतरले
पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते रस्त्यावर उतरून अन्याय आणि अत्याचाराविरोधात आंदोलनं करतात. आताही ते अनधिकृत वेश्या व्यवसायाविरोधात (Prostitute) रस्त्यावर उतरले आहेत. कात्रज ते आंबेगाव रस्ता परिसरात काही लॉजवर अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय चालवला जातो. याचा त्रास स्थानिकांना होत असल्यानं हा वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे त्यासाठी लॉजमालकांना निवेदनं दिली. जर वेश्या व्यवसाय बंद केला नाही, तर मनसे स्टाईलने खळ खट्याक करू, असा इशारा वसंत मोरेंनी दिला.
वसंत मोरे यांनी आज लॉज मालकांना निवेदनं दिली. त्यानंतर त्यांनी फेसबुक लाईव्ह येत सांगितलं की, दक्षिण पुण्यातील आंबेगाव बु. येथे अनेक लहान-मोठ्या सोसायट्या, शाळा जवळ असतांना खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे. कात्रज ते नवले पूल या मार्गावर हा वेश्या व्यवसाय चालतो. अभिनव शाळेच्या पुढे स्प्लेंडर रेसिडेन्सी, लोटस रेसिडेन्सी, मोक्षंगण सोसायटी आदी सोसायट्या आहेत. गजबजलेल्या भागात या वेश्या उभ्या असतात. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी कुचंबणा होत आहे. ये-जा करणाऱ्या महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं मोरेंनी सांगितलं.
विरोधी नेते भाजपसोबत का चाललेत? शरद पवारांनी सांगितलं खरं कारण…
ते म्हणाले, घरामधून कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिला असतील किंवा कामाला जाणाऱ्या महिला असतील तर त्या स्कार्प बांधून रिक्षा किंवा बससाठी उभ्या असतात. अशा महिलांना काही नागरिकांकडून वेश्या समजून विचारणा होते. मागच्या आठवड्यात तर एका व्यक्तीने तर सोसायटीतल्या एक महिलेला छेडलं. वेश्यांचे एजंट लोक रस्तयावर फिरतात.त्याचा त्रास महिलांना होता. याबाबत सोसायटीतील महिला व नागरिकांनी अनेकदा आमदार, खासदार आणि पोलिसांकडे तक्रारी दिल्या. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं नागरिकांनी हा प्रकार आपल्याला सांगितला. त्यानंतर आज महिला व नागरिकांच्या उपस्थितीत हॉटेल चालकांना निवेदनं दिली. दरम्यान, भविष्यात या परिसरात असे काही समोर आले तर, एजंट फिरतांना दिसले तर त्यांचा चौरंगा करू, असा इशारा मोरेंनी दिला