Jalgaon News : अनोख्या लग्नांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. काहींनी झाडांचे तर काहींनी कुत्र्यांचे लग्न लावले. असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. आता एक गाय आणि बैलाच्या लग्नाची मोठी चर्चा आहे. या लग्नात गायीला वधूप्रमाणे आणि बैलाला वराप्रमाणे सजवून नंतर वरात काढण्यात आली.
गाय आणि बैलाचा हा अनोखा विवाह मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन जिल्हा मुख्यालयापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या महेश्वर गावात पार पडला. महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातून ही वरात निघाली होती. यामध्ये भारवाड आणि मालधारी समाजाच्या 50 हून अधिक लोकांनी या अनोख्या सोहळ्यात सहभाग घेतला होता.
गाय आणि बैलाचे लग्न लावून देण्याची कल्पना सुचलेल्या जळगावच्या राणा भगत यांनी सांगितले की पुराण काळात ऋषी आणि महात्मे यांनी गायी-बैलांचे विवाह लावले आहेत. याला शिव विवाह मानले जाते. त्यांनी सांगितले की, आम्ही अहिल्या मातेच्या नगरी महेश्वरमध्ये गाय आणि बैलाचे लग्न लावून दिले आहे. यामध्ये सर्व समाजातील लोक सहभागी झाले होते.
Shivani Baokar : मराठी अभिनेत्री शिवानी बावकरचा ब्युटीफुल लूक
गावकऱ्यांनी या लग्नाला ‘शिवविवाह’ असे नाव दिले आहे. यामध्ये गायीशी (नंदिनी) विवाह करण्यासाठी बैल (नंदकिशोर) लग्नाची वरात घेऊन जळगावला पोहोचला होता. यानंतर दोघांचेही लग्न पूर्ण विधीवत पार पडले. दोघांचे वय सुमारे 12 महिने असल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नात वधू, वर, वरात आणि डीजे असे सर्व काही होते. वऱ्हाडी मंडळींनीही या लग्नाचा आनंद घेत डीजेवर जल्लोष केला.
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; PM मोदींचा कानमंत्र
आता या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या लग्नाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. लग्नाचे आयोजन करणारे जळगावचे रहिवासी राणा भगत यांनी सांगितले की, मी गुजरातमधून महाराष्ट्रात आलो तेव्हा मला वाटले की मी महेश्वरमध्ये विधी करू. पुराण काळात ऋषी-महात्मे हे गायी-बैलांचे लग्न लावत होते.