अहमदनगरः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला (Medical Officer) लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी -कोरडे असे तिचे नाव आहे. आपल्या सहकाऱ्याकडे दहा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB)अधिकाऱ्यांनी तिला आज रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहेत.
त्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर 2021 या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळण्याकरीता त्यांनी डॉ.वृषाली सूर्यवंशी यांची दोन महिन्यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी तुला मिळणाऱ्या रकमेच्या निम्मी रक्कम द्यावी लागेल असे त्यावेळी सांगितले .त्यानंतर एक महिन्यापूर्वी तक्रारदारांनी पुन्हा आरोपी लोकसेविका यांना भेटले असता त्यांनी आता काहीतरी रक्कम दे तरच मी तुझे बिलासंबंधी पुढील कारवाई करेल असे सांगितले.
ICC T20 Ranking: टी20 आयसीसी रँकिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप
त्यामुळे तक्रारदाराने जवळ असलेले साडेचार हजार रुपये त्यांना त्यावेळी दिले .त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी पुन्हा डॉ.वृषाली सूर्यवंशी यांची भेट घेऊन बिला संदर्भात विचारणा केली असता पुन्हा बिलाच्या निम्म्या रकमेची मागणी केली व तडजोडीत ती दहा हजार रुपये तरी द्यावे लागतील असे सांगितले.
लाच देण्याची त्यांची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला आज बुधवारी मागणीप्रमाणे दहा हजार रुपयां ची लाच स्वीकारताना डॉ. वृषाली सूर्यवंशी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली .पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हरीश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे ,बाबासाहेब कराड ,महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के व चालक पोलीस हवालदार हरुण शेख यांचा या पथकात समावेश होता .महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.