Ahmednagar Breaking : अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये. नुकताच दुचाकीवर भरधाव वेगाने जाणारा एक तरुण थेट उड्डाणपुलावरून खाली पडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दिशेने निघालेला हा तरुण चांदणी चौकाच्या आसपासच्या उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, अहमदनगर उड्डाणपुलावर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक तरुण छत्रपती संभाजीनगर येथून पुण्याच्या दिशेने निघाला होता. नगर शहरातील चांदणी चौक परिसराजवळपास आल्यावर दुचाकीस्वाराचा वाहनवारील नियंत्रण सुटले.
उड्डाणपुलावरील स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर त्याचा तोल गेला आणि तो काही क्षणात उड्डाणपुलावरून थेट खाली पडला. या दुर्घटनेत त्याची दुचाकी मात्र उड्डाणपुलावरच राहिली होती. उड्डाणपुलावरून खाली पडल्याने तरुण अत्यंत गंभीर जखमी झाला आहे.
अरे देवा! घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; वनिता खरातचा नवऱ्याबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
संबंधित जखमी तरुणाला तेथील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या तरुणाच्या दुचाकीचा वेग ताशी 80 किमी असावा, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान यापूर्वीही उड्डाणपुलावर अनेक अपघात झाले आहे. अशाच एका अपघातात एकाचा बळी देखील गेला आहे.