अरे देवा! घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; वनिता खरातचा नवऱ्याबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T125909.537

Vanita Kharat video viral: अभिनेत्री वनिता खरातचे (Vanita Kharat ) चाहतेवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. (Vanita Kharat video viral) पण त्यासोबतच मराठीसह हिंदी सिनेमामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)


वनिताचा देखील चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. वनिताने फेब्रुवारी महिन्यामध्ये सुमित लोंढेशी लग्न केले आहे. जवळील मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले आहे.

यानंतर वनिता सोशल मीडियावर सक्रिय राहून तिचे आणि सुमितचे काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. आता तिने नुकताच पोस्ट केलेला तिच्या नवऱ्यासोबतच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वनिताने काल तिचा नवरा सुमितसोबत एक रील पोस्ट केले आहे.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

त्या व्हिडीओमध्ये वनिता नवझुद्दीन सिद्दीकीच्या ‘मांझी द माउंटन मॅन’ सिनेमातील“ओह फगुनिया….” हा प्रसिद्ध डायलॉग सुमितकडे बघून बोलत असताना दिसत आहे. तर हा डायलॉग बोलत असताना तिने सुमितला गालावर किस केलं आहे. आता वनिताने हा पोस्ट केलेला व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे.

यावर प्रतिक्रिया देत तिचे चाहते त्यांचा हा मजेशीर अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. तर याबरोबरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात तिच्या सहकलाकारांनी देखील यावर कॉमेंट्स करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube