मोठी बातमी: नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा ट्वीस्ट, भाजपच्या बंडखोर अनिल सोलेंची माघार

Nagpur Graduates constituency-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर अनिल सोले यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केला आहे

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Anil Sole

Nagpur Graduates constituency: नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले (Anil Sole) यांनी निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर अनिल सोले यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केला आहे.सोले यांनी माघार घेतल्यानंतर फडणवीस यांनी त्यांचे कौतुक करत योग्य निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

सुनेत्रा पवारांचा ‘सोमेश्वर’वर दणदणीत विजय; युगेंद्र पवार, पुरुषोत्तम जगतापांचा सुपडा साफ

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरविले होते. तर भाजपचे माजी आमदार व नागपूरचे माजी महापौर अनिल सोले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज माघारीचा दिवशीही अनिल सोले यांनी उमेदवारी मागे घेतली नव्हती. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतविभाजनाचा फटका भाजपला बसू शकतो, अशी राजकीय चर्चा सुरू झाली होती.


सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पराभव होताच लक्ष्मीदर्शनाचा वार; मावळत्या अध्यक्षांचा विजयी पॅनेलवर वादळी आरोप

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोले यांनी यू टर्न घेत निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांचे चिन्ह हे मतपत्रिकेवर राहणार आहे. पण आता सोले हे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचे काम करणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपचे कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची फाईट होणार आहे.

follow us