सुनेत्रा पवारांचा ‘सोमेश्वर’वर दणदणीत विजय; युगेंद्र पवार, पुरुषोत्तम जगतापांचा सुपडा साफ

Someshwar Sugar Factory Election Result : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Sunetra Pawar

Someshwar Sugar Factory Election Result : Someshwar Sugar Factory Election Result : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर पुरुषोत्तम जगताप, शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्या पॅनेलचा सुपडासाफ झाला आहे. सहकाराचा या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना घेरण्याची रणनिती शरद पवार गट व विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगतापांनी (Purshottam Jagtap) आखली होती. त्यामुळे तिरंगी लढत झाली. त्यात सभासदांनी बडंखोर पुरुषोत्तम जगतापांनी हिसका दाखवत त्यांना पराभूत करत सुनेत्रा पवारांवर विश्वास दाखविला आहे.


सुनेत्रा पवारांचा ‘सोमेश्वर’वर दणदणीत विजय; युगेंद्र पवार, पुरुषोत्तम जगतापांचा सुपडा साफ

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या कारखान्याची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांना मात देण्याचा रणनिती विरोधकांची होती. त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचे युगेंद्र पवारांचा होता. परंतु सुनेत्रा पवार या स्वतः प्रचारात उतरल्या होत्या. सर्व भागात त्या प्रचाराला गेल्या होत्या. त्यांनी कारखाना आपल्याकडे खेचून आणत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.


कधी मतभेद, तर कधी राजकीय निशाणा; शेषन ते ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्तांच्या वादग्रस्त कारकिर्द


पुरुषोत्तम जगतापांचे बंड मोडीत काढले

तब्बल 35 वर्षांपासून पुरुषोत्तम जगताप हे कारखान्याचे संचालक होते. तर तेरा वर्षांपासून चेअरमन होते. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून पुरुषोत्तम जगताप मानले जात होते. परंतु या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत सुनेत्रा पवारांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सभासदांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुरुषोत्तम जगतापांना झटका दिला आहे.

पुरुषोत्तम जगतापांचा 6464 मतांनी पराभव
या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा तब्बल 6464 मतांनी पराभव झाला आहे. या पराभवानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलवर गंभीर आरोप केला आहे. या विजयात कुणाचेही क्रेडिट नाही. फक्त वीस हजार लोकांना सात हजार रुपयांप्रमाणे लक्ष्मीदर्शन केले, यामुळेच आमचा पराभव झाला असा आरोप जगताप यांनी केला आहे.

follow us