Sunetra Pawar यांच्यासाठी पुण्यानंतर काटेवाडीकरही एकवटले; थेट मंत्रिपदाची केली मागणी

Sunetra Pawar यांच्यासाठी पुण्यानंतर काटेवाडीकरही एकवटले; थेट मंत्रिपदाची केली मागणी

Villagers demand for Sunetra Pawar Minister ship : बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटाचा पराभव झाला. शरद पवारांनी पुन्हा बाजी मारली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) दणदणीत पराभव केला. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री ( Minister ship ) करण्याची मागणी काटेवाडी या अजित पवारांच्या गावच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Darshan Thoogudeepa: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळगावी काटेवाडीत ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली एकमताने केली आहे. तसेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती व पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळून काम करण्याची ऊर्जा मिळेल. असं देखील ग्रामस्थांचं म्हणन आहे.

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा टँक टॉपमधील लूक, चाहत्यांना लावलं वेड

दरम्यान या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 व्या वर्धापन दिनी पुणे शहरातील पक्ष कार्यालयात देखील अशाच प्रकारे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. यावेळी सुनेत्रा पवारांना राज्यभेवर पाठवा, असा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला आणि पारित झाला. या ठरावामध्ये सुनेत्रा पवारांना राज्यभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल, असंही म्हटलं गेलं.

पराभवामुळे सुनेत्रा पवारांचे दिल्लीत जाण्याचं स्वप्न अधुरे राहिले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पाठवण्याचा चंगच बांधला आहे. दुसरीकडे पुण्यातील भाजपची वाढती ताकद आणि मोहोळांना मंत्रिपद मिळणं यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. त्यामुळं आता अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाऊन मंत्री होणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज