Download App

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर, आमदार तांबेंच्या मागणीला यश

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या (Shri Ram Temple) उद्घाटनाच्या निमित्ताने २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली होती. तांबेंनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. दरम्यान, तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सार्वजिक सुट्टी जाहीर केली आहे.

ED Notice : रोहित पवारांचा ईडीला आग्रह, दोन दिवस आधीच येतो 

सर्व लोकांना रामलल्ला प्राणप्रतीष्ठापना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी हा दिवस देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात आदेशही जारी केला. केंद्राने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेऊन केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. राज्यातील सर्व लोकांना या आनंदाच्या क्षणात सहभागी होता यावं, तसेच राज्यात असलेल्या या उत्सवी वातावरणामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी लक्षात घेऊन लोकांना होणारा त्रास टाळावा, या दुहेरी हेतूने आमदार सत्यजीत तांबेंनी पत्राद्वारे ही मागणी केली होती.

Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शेअर बाजारच्या वेळेतही बदल, दुपारनंतर सुरू होणार बाजार 

प्राणप्रतिष्ठापना दिनी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील सर्वच शहरांमध्ये आणि गावांमध्ये मिरवणुका, आतषबाजी आणि उत्सवाचं वातावरण असेल. तसेच सर्वच लोकांना या उत्सवात सहभागी होता यावं, यासाठी राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सरकारने पूर्ण दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अयोध्येत मोठा पोलीस बंदोबस्त
या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कोपऱ्यात उत्तर प्रदेश पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. अयोध्येला छावणीचे स्वरूप आले आहे. यूपी पोलिसांचे विशेष डीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, यूपी पोलिसांनी या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. अयोध्येकडे जाणारे सर्व रस्ते सुरक्षित करण्यात आले आहेत. येथे कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रस्त्यांवर ठराविक अंतराने पेट्रोलिंग करण्यात येत आहे.

follow us