Download App

‘थर्टी फस्टला’ना दारू, ना मटन; नगरमधल्या ‘या’ गावाने आखला आमटी-भाकरीचा बेत

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – नवं वर्षाला (new year) अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज झाले. थर्टी फर्स्ट म्हटलं कि दारू पार्ट्या, चिकन – मटण पार्ट्यांचं आयोजन केल जातं. हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करणं हे तर नित्याचेच झालं. मात्र याला फाटा देत एक अनोखा संदेश नगर जिल्ह्यातील एका गावाने दिला आहे. आगडगाव (Agadgaon) असे या गावाचे नाव असून या गावाची चर्चा ही राज्यात होऊ लागली आहे. आगडगाव येथील श्रीक्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थानने (Kal Bhairavnath Temple) 31 डिसेंबर रविवारी (December 31st) आल्याची पर्वणी साधत गावातील आणि पंचक्रोशितील ग्रामस्थांनी इतर कुठल्या पार्ट्यांऐवजी आमटी-भाकरीचा बेत आखला आहे.

‘जयंत पाटलांमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता’; शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

विशेष म्हणजे यासाठी 151 अन्नदात्यांना संधी मिळणार असून पंधरा ते वीस हजार भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बाजरीची भाकरी व काळ्या मसाल्याची झणझणीत आमटी हे आगडगावची खासियत आहे. देवस्थानामार्फत हा प्रसाद दर रविवारी भाविकांना दिला जात असतो. विशेष म्हणजे या अन्नदानासाठी राज्यभरातून भाविकांकडून नोंदी केली जात असते. यातच यंदाचा वर्षाचा शेवटचा दिवस हा रविवार म्हणजे 31 डिसेंबर रोजी आला. रविवार असल्याने नव्या वर्षाचं स्वागत व थर्टी फर्स्ट हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जावा असा मानस देवस्थान व ग्रामस्थांनी व्यक्त केला. शिवाय, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रविवार येत असल्याने अन्नदानासाठी भाविक देखील आग्रही होते. यामुळे 151 अन्नदात्यांच्या हस्ते अन्नदान करण्याचा निर्णय ट्रस्टच्यावतीने घेण्यात आला.

CM Shinde : पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला का? CM शिंदेंनी तीन वेळा टाळलं पण, ठणकावूनच सांगितलं 

नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभर तयारी सुरु आहे. रसिकांसाठी हॉटेलमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले जाऊ लागले आहे. हॉटेल, रेस्टोरंट हे सज्ज झाले आहे. दारू, चिकन, मटण आदींनी पार्ट्या या रंगल्या जातात. मात्र या विचाराला फाटा देण्याचा व समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न नगर जिल्ह्यातील आगडगाव ग्रामस्थांनी केला. या गावी श्रीक्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान असून या ठिकाणचा महाप्रसाद हा राज्यभर प्रसिद्ध आहे. राज्यभरातून तसेच देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात. निसर्गरम्य ठिकाण असल्यानं या ठिकाणी भाविकांची गर्दी देखील होत असते.

नगर जिल्ह्यातील अनेक गावात अलीकडेच असा आमटी-भाकरीचा प्रसाद सुरू करण्यात आला आहे. यासंबंध आगडगाव देवस्थानचे सल्लागार मुरलीधर कराळे यांनी सांगितले की, आगडगाव देवस्थानने पशुहत्या बंदीचा निर्णय घेऊन आमटी-भाकरीचा महाप्रसाद सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय पूर्वीच घेतला. तसेच आज गावाातील आणि पंचक्रोशितील ग्रामस्थ इतर कुठल्या पार्ट्यांऐवजी आमटी-भाकरीचा बेत करणार आहेत.

follow us