CM Shinde : पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला का? CM शिंदेंनी तीन वेळा टाळलं पण, ठणकावूनच सांगितलं

CM Shinde : पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला का? CM शिंदेंनी तीन वेळा टाळलं पण, ठणकावूनच सांगितलं

CM Shinde : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी तीन वेळा त्यांना या प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला त्यानंतर शिंदेंनी उत्तर देत विरोधकांना ठणकावलं. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, असे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  शिंदे म्हणाले, खोट्या बातम्यांवर आजिबात विश्वास ठेऊ नका. दीपक केसरकर स्वतः येथे आहेत. मी सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा केली आहे. आपल्या राज्याचा हा प्रकल्प आहे. त्यामुळं हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा, असेही शिंदे म्हणाले.

Sindhudurg : महाराष्ट्राला धक्का! सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्पही गुजरातला

शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना या प्रकल्पाबाबत सातत्याने विचारले. शिंदे मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राहिले. परंतु, तिसऱ्या वेळी प्रश्न आल्यानंतर मात्र त्यांनी ठामपणे उत्तर दिले. राज्यातला हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत राज्याबाहेर जाणार नाही, असे ठणकावून सांगितले.

देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात होणार होता. मात्र, येथील प्रकल्प बंद पडला असून गुजरातला प्रकटणार आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील या प्रकल्पासाठी 56 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. इतकेच नाही तर काही निधीही देण्यात आला होता. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सरकारमध्ये वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि पर्यटन खात्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बातम्या यांमुळे हा प्रकल्प रखडला. आता पुन्हा प्रकल्प सुरू होईल याची सूतराम शक्यता राहिलेली नाही.

‘गुजरातला जाणारे प्रकल्प रोखण्याची हिंमत राणेंमध्ये नाही’ ‘पाणबुडी’ प्रकल्पात राऊतांची ठिणगी

राऊतांचीही जहरी टीका 

महाराष्ट्रामधून १७ प्रकल्प बाहेर गेले असे असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे आकडे देतात. दोघेही आता तोंड शिवून गप्प बसले आहेत. दहशतीखाली उद्योगपती यांना घेऊन चालले आहेत. मुंबईची वाट लावण्याचे धोरण हे सरकार करत आहे. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत. नरेंद्र मोदी म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा, कुठल्याही पंतप्रधानांनी असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत. नारायण राणे यांच्यात इतकी ताकद नाही की ते उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलतील. सिंधुदुर्गातील प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखण्याची हिंमत नारायण राणे यांच्यात नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube