Sindhudurg : महाराष्ट्राला धक्का! सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्पही गुजरातला

Sindhudurg : महाराष्ट्राला धक्का! सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्पही गुजरातला

Sindhudurg News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात असते. आता याच टीकेला बळ देणारा प्रकार सिंधुदुर्गात (Sindhudurg News) घडला आहे. देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात होणार होता. मात्र, येथील प्रकल्प बंद पडला असून गुजरातला प्रकटणार आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील या प्रकल्पासाठी 56 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. इतकेच नाही तर काही निधीही देण्यात आला होता. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सरकारमध्ये वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि पर्यटन खात्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बातम्या यांमुळे हा प्रकल्प रखडला. आता पुन्हा प्रकल्प सुरू होईल याची सूतराम शक्यता राहिलेली नाही.

सावधान! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ 

सिंधुदुर्गात मागील पंधरा वर्षात सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प सुरू झाला नाही. नुसत्याच घोषणा झाल्या. आताही पाणबुडी प्रकल्प सुरू करण्याची सर्व तयारी झाली होती. प्रकल्पासाठी निधीही मिळाला होता. फक्त काम सुरू होणे बाकी होते. मात्र प्रशासकीय पातळीवरील लाल फितीच्या कारभाराचा फटका बसलाच. या सावळ्यागोंधळामुळे प्रकल्पाचे काम काही सुरू झाले नाही.

राज्य सरकारच्या दृष्टीने हे मोठेच अपयश म्हणावे लागेल. आता सध्याच्या परिस्थितीत हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल याची शक्यता कमीच आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. याआधी नौदलह दिनही त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा तातडीने निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी हे दोन्ही मंत्री जोर लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Nitesh Rane : नारायण राणेंनंतर नितेश राणेंनीही काढला जरांगेचा अभ्यास; म्हणाले, त्यांना राष्ट्रवादीचा ‘तो’ पदाधिकारी 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज