सावधान! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’

सावधान! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’

Maharashtra Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार त काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह उपनगर ठाणे, पु्णे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या पावसाची स्थिती पाहता पाऊस विश्रांती घेईल अशी शक्यता दिसत नाही. आता हवामान विभागाने नवा अंदाज वर्तवला असून मुंबईसह चार जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांतच या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

School Closed in Mumbai : मुंबई अन् उपनगरातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी…

भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत या ठिकाणी जोरदार पाऊस होईल. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यासाठी उद्याही रेड अलर्ट दिला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे जोरदार पाऊस

राज्यात जुलै महिन्यातच इतका मुसळधार पाऊस होण्यामागे कारण आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला रेड अलर्च जारी केला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावर तयार झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचाा पट्टा कायम असल्याने किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.

मुंबई व उपनगरातील शाळा-कॉलेजेसना सुट्टी

महाराष्ट्रातल्या कोकण भागातंही पावसाचा हैदोस सुरु असून पुढील काही दिवसही अशीच अतिवृष्टी राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत माहिती दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube