Download App

मोठी बातमी ! मराठा आरक्षणासाठी कोपर्डीतही उद्यापासून बेमुदत आंदोलन

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopradi) मुलीवरील अत्याचार व हत्येनंतर राज्यातील मराठा समाज एकवटला होता. त्यावेळीही मराठा आरक्षणासह अनेक मागण्या पुढे आल्या होत्या. या घटनेनंतर राज्यभर मराठा समाजाचे आंदोलने झाली. आता जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेसह विविध मागण्यांसाठी आता पुन्हा कोपर्डीत आंदोलन होणार आहे. उद्या मंगळवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

Maratha Reservation : ‘विरोध नाही पण ओबीसी आरक्षणात मराठा समाज.., ; छगन भुजबळांचं मोठं विधान

याबाबतचे कर्जत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. 13 जुलै 2016 रोजी कोपर्डी येथील पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. येथील मुलीच्या हत्येनंतर मराठा समाज एकत्र आला होता. त्यानंतर मराठा समाजाने अनेक मागण्या मांडल्या होत्या. त्याला तत्कालीन सरकारने अनेक वेळा खोटी आश्वासने देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

Jalna Maratha Protest : ‘काही नेते वेळेवर पोहोचून सर्व गोष्टी..,’; एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा…

जालना येथे मराठा समाजाचे उपोषण चालू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अंतरवली सराटी येथील भ्याड हल्ल्याची चौकशी करावी, ज्यांनी हल्ला केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच मुलीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, कर्जत तालुक्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. कर्जत तालुक्यात पाण्याचे टँकर चालू करावे, चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशा अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्यात.

कोपर्डी येथे बेमुदत उपोषण व आंदोलन मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. लालासाहेब सुद्रिक, हरिशचंद्र सुद्रिक, भाऊसाहेब सुद्रिक, सुभाष सुद्रिक यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनाही देण्यात आलेले आहे.

Tags

follow us