Maratha Reservation : ‘विरोध नाही पण ओबीसी आरक्षणात मराठा समाज.., ; छगन भुजबळांचं मोठं विधान

Maratha Reservation : ‘विरोध नाही पण ओबीसी आरक्षणात मराठा समाज.., ; छगन भुजबळांचं मोठं विधान

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण 17 टक्क्यात 54% ओबीसी समाज अन् मराठा समाज बसणार नसल्याचं मोठं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी केलं आहे. नाशिकमध्ये आज छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 Amitabh Bachchan अन् किंग खान दिसणार एकत्र; आगामी प्रोजेक्टची आणखी एक झलक पाहिलात का?

मंत्री भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षण फक्त 17 टक्के उरलेलं आहे, या 17 टक्के आरक्षणामध्ये एकूण 400 जातींचा समावेश असून 17 टक्क्यात 54% ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही, त्यामुळे आणखीन 10 टक्क्यांनी वाढ करुन मराठा समाजासह पटेल, कापू, जाट समाजालाही आरक्षण द्या म्हणजे सर्वांचाच प्रश्न मिटणार असल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.

उद्या तलाठी परीक्षा होणारच, वेळेपूर्वी सेंटरवर हजर राहा; परीक्षा आयोजक संस्थेचा उमेदवारांना मेल

तसेच भारत सरकारने 50 टक्क्यांचा कॅप ओलांडून 10 टक्के ओपनला वाढवलं आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता धक्का मराठा समाजाला कसा न्याय देता येईल? हे बघितलं पाहिजे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Pune : पाच अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या; दारुच्या नशेत दगडाने ठेचून घेतला जीव

सर्वच नेत्यांनी दिल्लीत जाऊन बसलं पाहिजेत, हे सगळं सहज करता येणं शक्य आहे, नाहीतर या सगळ्या लढाया सुरुच राहणार आहेत, मोर्चे निघणार, आंदोलन होणार, परत तोंडाला पाण पुसली जाणार असल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत.

उपोषण केल्याने मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून उपचारासाठी दाखल होण्याबाबत विनंती केली होती. मात्र, जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विनंती करुन त्यांनी उपचारासाठी घेऊन जात असतानाच दगडफेकीची घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं, त्यावरुन राज्यात आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube