Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी असल्याचं भासवून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेत त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलीयं. ऋषिकेश एकनाथ हापसे 32 (रा. राहुरी) असं या आरोपीचं नाव असून जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयात शिक्षा ठोठावलीयं. या खटल्याचे काम विशेष सरकारी वकील म्हणून मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादीची अल्पवयीन लहान बहीणी तिच्या दोन मैत्रीणीसह शाळेत जातो असं सांगत घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर सिध्दीबाग येथून या तिन्ही पीडित मुली त्यांच्या मित्रांसमवेत डोंगरगणला फिरण्यासाठी गेल्या होत्या. डोंगरणवरुन परतल्यानंतर तिन्ही पीडित मुली सिद्धीबाग परिसरात होत्या. सिध्दीबाग बाहेरील रस्त्यावर फिरत असताना आरोपी सोमनाथ उर्फ ऋषीकेश एकनाथ हापसे हा चारचाकी गाडीत त्यांच्याजवळ आला. तुम्ही कोण आहात एवढ्या उशिरा काय करत आहात, पोलिसांना फोन लावू का? असा सवाल त्याने मुलींना केला. त्यानंतर पीडीत मुलींनी आरोपीस तुम्ही कोण आहात असे विचारले असता त्याने मी चाईल्ड लाईनचे काम करतो, मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून त्याच्या गाडीत बसवलं. त्यानंतर मुली गाडीत बसल्या त्याने पीडित मुलींना रात्री बाराच्या सुमारास तो राहत असलेल्या त्याच्या रुमवर घेऊन गेला.
पालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचा मास्टर स्ट्रोक; राज ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी झटक्यात मान्य
पीडित मुली या आरोपीसोबत रात्रभर रुमवर राहिल्या. त्यावेळी आरोपीने दोन मुलीशी अश्लील वर्तन केले. तसेच एका मुलीसोबत तिच्या इच्छेविरुध्द शारिरिक संबंध ठेवले. दुस-या दिवशी तिन्ही पीडित मुलींनी आम्हाला हैद्राबादला नातेवाईकांकडे जायचे असल्याचे सांगितल्याने आरोपीने त्यांना रेल्वे स्टेशन अहमदनगर येथे त्याचे गाडीतून आणून सोडले. त्यानंतर तीन्ही मुली रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशन येथे गेल्या. पुणे स्टेशनवरुन हैद्राबादला गेल्या. तेथे एका पीडित मुलीच्या ओळखीच्या व्यक्तीच्या लॉजवर थांबल्या. अल्पवयीन पीडीत मुली लॉजवर आल्याचं समजताच लॉज मालकाने हैद्राबाद पोलिसांना मुलींकडे त्यांची माहिती मागवली. त्यानंतर हैद्राबाद पोलिसांनी तीन्ही पिडीत मुलींना लॉजवर जाऊन ताब्यात घेतले. हैद्राबाद पोलिसांनी तोफखान पोलिसांना माहिती दिल्यानंतर पीडित मुलींना ताब्यात घेतलं. त्यानंतर मुलींनी पोलिसांना जबाब दिला.
दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माथुरी एच. मोरे यांनी आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 8, भा. द. वि. कलम 363, 366, 534 अन्वये दोषी धरून आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 8 नुसार चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तीन हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भा. द. वि. कलम 366 नुसार 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड 3000 रुपये, दंड न भरल्यास एक महिना साथी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आलीयं.