Video : मी तेव्हा शाहंशी सौम्य शब्दांत बोललो नाही; पत्राचाळवर प्रश्न विचारताच राऊतांनी पुन्हा लोड केली तोफ…

Video : मी तेव्हा शाहंशी सौम्य शब्दांत बोललो नाही; पत्राचाळवर प्रश्न विचारताच राऊतांनी पुन्हा लोड केली तोफ…

Sanjay Raut Exclusive : माझं पुस्तक छापायला मोठ्या-मोठ्या प्रकाशकांनी आणि सारस्वतांनी नकार दिल्याचं संजय राऊत यांनी पुस्तकात म्हटलय. त्यावर विचारलं असता राऊत म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकरांच्या पुस्तकालाही छापण्यासाठी नकार दिला होता.  (Sanjay Raut) सरकारचा जो शत्रू आहे त्याच्याशी संबंध ठेवण म्हणजे सरकारची पंगा घेण्यासारख आहे. त्यामुळे अनेकजन भितात असं म्हणत पुस्तक छापण्यासाठीही किती भितीदायक वातावरण आहे यावर संजय राऊत बोलले आहेत. ते लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलत होते. लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी राऊतांना अनेक थेट प्रश्न विचारत माहित नसलेले किस्से राऊतांकडून काढून घेतले आहेत.

त्यावेळी मोदींची स्तुती केली पण..

२०१४ च्या अगोदर मोदी यांची स्तुती करणारे राऊत त्यांना जेलमध्ये कसकाय घातले असं विचारलं असता राऊत म्हणाले, अमित शाहा तर राष्ट्रीय राजकारणात फार ज्युनिअर आहेत. त्यांना आणखी दिल्ली समजलेली नाही. तसंच, पंतप्रधान मोदींनाही दिल्ली फार समजली नाही. परंतु, त्यांनी जेव्हा देशाचे सुत्र हाती घेतले तेव्हा आम्ही त्यांच मोठ कौतुक केलं आहे. सर्वच स्तरावरून कौतूक केलं आहे. परंतु, एखाद्या नेतृत्वाबद्दल जेव्हा आपला भ्रमनिराश होतो तेव्हा आपल्याला राष्ट्रहित्याच्या दृष्टीने एक भूमिका घ्यावी लागते.

..तो भाजपचा भ्रम आहे

तशी भूमिक घेतली नाही तर तुम्ही देशद्रोही ठरता. तुम्हा भारत माता की जय, वंदे मातरम हे बोलण्याच अधिकार नाही असंही राऊत यावेळी म्हणाले. तसंच, त्यांनी भाजपमुळे शिवसेनेला फायदा होते या प्रश्नालाही थेट उत्तर दिलं. २०२४ ला भाजपशिवाय २४ आले आमचे. आमच्यामुळं शिवसेनेला फायदा होतो हा त्यांनी भ्रम आहे. भाजप लोकांच्या जिवाव निवडून येणार पक्ष नाही. तो व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. ते झालच तर ते कुणाचा पक्ष फोडून सरकार बनवणारे लोक आहेत.

Video : आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत नरकातला स्वर्ग का म्हणाले?; पाहा लेट्सअपची खास मुलाखत

मित्र जेव्हा मित्रासारख वागत नाही

युती तोडली नसती तर तुम्हाला तुरुंगात जाव लागलं नसत. युती तोडल्याचं शल्य आहे का? तर राऊत म्हणाले असं अजिबात नाही. युती तुटली म्हणून मी काय केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री झालो का? असा उलटसवाल करत राऊतांनी ते झालं ते योग्य झालं असंही राऊत म्हणाले. तसंच, ही युती दोन्ही वेळी भाजपकडूनच तोडली असंही राऊत म्हणाले. मित्र जेव्हा मित्रासारख वागत नाहीत तेव्हा आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागला.

आम्ही काय मागत होतो?

हे का केलं? तुमच्या मनात पाप आहे. तुमच्या मनात खोट आहे. असं म्हणत भाजपवर राऊतांनी मोठा घणाघात केला. बनावट शिवसेना तयार करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं मग आम्ही काय मागत होतो? आम्हाला का दिलं नाही? असं म्हणत राऊतांनी भाजपला झोडपलं. यांना बाळासाहेबांचे विचार संपवायचे आहेत. आम्हाला संपवायचं आहे असंही राऊत यावेळी म्हणाले.

 फार सौम्य भाषेत बोललो नाही

पत्राचाळ प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना फोन केला होता असं विचारलं असता, राऊत म्हणाले मी काय फार सौम्य भाषेत बोललो नाही. अमित शाहा यांना थेट भाषेत सांगितलं की मी इथ बसलोय. इतरांना कुणाला त्रास देण्यापेक्षा मला अटक करा. मी कुणाला घाबरत नाही. इतरांना कशाला भीती दाखवता. असं म्हणत राऊतांनी शाहांना सांगितल्याचं राऊत म्हणाले.

त्यांच्या आदेशाने सगळं घडत

दरम्यान, आम्ही दाऊदला भिडलेले लोक आहोत. यांना आम्ही घाबरत नाही असं म्हणत राऊतांनी त्यावेळचा किस्सा सांगितला. त्याचवेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचाही फोन आल्याचं राऊतांनी सांगितलं. हे काय चाललय. त्यांच्या आदेशाने सगळं घडतय. हिम्मत असेल तर आम्हाला अटक करा असं सांगितल्याचं राऊत म्हणाले. यावेळी राऊतांनी जेलमधील काही गोष्टीही सांगितल्या.

 छळ करायचा होता

कैदी हा कैदीच असतो. ८८३६ असा माझा कैदी नंबर होता. त्या ठिकाणी कुणी राजकीय कैदी नसतो. तसा कुठला प्रकारच नाही. मला कसाबला ठेवलं त्या ठिकाणी ठेवलं. म्हणजे सगळं पाहिलं जात की, आम्हाला सूर्यप्रकाश येतो का? हवा येते का ? तिथ काय अवस्था आहे हे सगळं पाहिलं जात. कारण आमचा यांना छळ करायचा होता. असा मोठा खबळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.

 ही लोक व्यापारी आहेत

या काळात मोदींनी पवारांना फोन करून सांगितलं की अमित शाहा माझा फार जवळचा मित्र आहे. त्यांना वाचवा असा दावाही राऊतांनी यावेली केला. कारण ही लोक व्यापारी आहेत. लोकांना फसवणं, गंडवण असं करत हे आपला फायदा करून घेतात असं म्हणत यांच्यावर स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे मोठे उपकार आहेत. पण ही लोक व्यापारी वृत्तची असल्याचे ते उपकार विसरले असंही राऊत यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube