Download App

Ahilyanagar : जबरी चोरी करणारा सराई आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

नगर शहरात विविध ठिकाणी जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

  • Written By: Last Updated:

अहिल्यानगर – अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. आता नगर शहरात विविध ठिकाणी जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अक्षय बाबुराव धनवे (Akshay Baburao Dhanve) (वय 32, रा. प्रेमदान हाडको, सावेडी, अहिल्यानगर) असं जेरबंद आरोपीचं नाव आहे.

मोहनलालच्या ‘बॅरोज’चा ट्रेलर आऊट, चित्रपट 3D अनुभवाच्या सहाय्याने वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार 

याबाबत अधिक माहिती अशी, 9 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर शहरामध्ये फरार आणि वॉन्टेंड आरोपींचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 1799/2023 या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी अक्षय धनवे (रा.प्रेमदान हाडको, सावेडी, अहिल्यानगर) हा त्याच्या राहत्या घरी घरी येणार आहे. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या राहत्या घरी धाड टाकून आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अक्षय बाबुराव धनवे (वय 32, रा.प्रेमदान हाडको, सावेडी, अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती घेऊन, पडताळणी केली असता त्यांच्यावर 3 जबरी चोरीच्या गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झाले आहे.

फडणवीसांचा शिंदेंना मोठा झटका, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे नवे प्रमुख रामेश्वर नाईक, मंगेश चिवटेंना हटवलं… 

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अक्षय बाबुराव धनवे याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 1799/2023 भादंविक 392, 341, 34 हे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आता पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे. सदरची कारवाई राकेश ओला (पोलीस अधीक्षक) प्रशांत खैरे (अपर पोलीस अधीक्षक) अमोल भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

follow us