Download App

Ahilyanagar Crime : आधी प्रेमाच्या जाळात ओढलं, मग मित्रांच्या मदतीने…; नगरमधील धक्कादायक घटना

  • Written By: Last Updated:

अहिल्यानगर – मित्रांच्या मदतीने एकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला लुटण्याची धक्कादायक घटना शहरात समोर आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या महिलेच्या तीन साथीदारांना बीडमधून (Beed) अटक केली आहे. तर महिला अद्याप फरार आहे.

मुंबईत विंटेज कार संग्रहालय उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस मागणी करणार 

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) आणि त्यांची मैत्रीण असे एमआयडीसी परिसरात असताना 3 अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण केली होती. तसेच त्यांच्या मैत्रिणीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाचाही मागणी केली होती. मारेकऱ्यांनी एक लाख रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत असताना या पथकास सदरचा गुन्हा हा मयुर ढोले (रा.बीड) याने त्याच्या साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

‘या’ 5 कारणांमुळे शेअर बाजारात उलथापालथ; सेन्सेक्स 824 अंकांनी घसरला, निफ्टी 23000 च्या खाली 

पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयित इसमांचा बीड शहरामध्ये शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. 1)मयुर मधुकर ढोले (वय 27, रा.सुयोग अपार्टमेंट, शिवाजीनगर, बीड 2) अभिजीत शंकर गलधर (वय 27, रा.सिध्देश्वर, एमआयडीसी बीड) 3) नितीन स्वामी डांगरे (वय 26, रा. बुरूडगल्ली, हिरालाल चौक, बीड) असे या आरोपींची नावे आहेत.

कसा घडला गुन्हा?
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींची पथकाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा प्रियंका पांडुरंग ढलपे (रा.बीड) हिचे मदतीने केल्याची माहिती समोर आली. आरोपी मयुर मधुकर ढोले याने सांगितले की, आपली मैत्रीण प्रियंका पांडुरंग ढलपे सध्या विळदघाट परिसरात नोकरीस असून तिची सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर यांच्याशी ओळख झाली. तिनेच सुरेंद्र यांना प्रेमाच्या जाळयात अडकवले आणि त्यांच्याकडून पैसे काढायचे असा प्लॅन ठरवला. त्यानुसार 24 जानेवारी रोजी प्रियंका आणि सुरेंद्र एमआयडीसी परिसरात गेले असता तिथे आम्ही पोहोचला आणि सुरेंद्र यांना मारहाण केली. तसेच त्यांचे व्हिडिओ व्हायरल कऱण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, प्रियंका ढलपे अद्याप फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

follow us