मुंबईत विंटेज कार संग्रहालय उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस मागणी करणार

  • Written By: Published:
मुंबईत विंटेज कार संग्रहालय उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस मागणी करणार

प्रतिनिधी : प्रशांत गोडसे 

Amruta Fadnavis : देशाची आर्थिक राजधानी, मायानगरी मुंबईत वेगवेगळे फेस्टिव्हल पार पडत असतात.अशातच विंटेज कार प्रदर्शन (Vintage Car Exhibition) तर सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला असून त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे विंटेज कारचं म्युझियम मुंबईत व्हावे अशी आपली ईच्छा असून मुंबईत शक्य तितक्या लवकरात लवकर विंटेंज कार संग्रहालय उभारण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी दिली आहे.

मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये दोन दिवशीय विंटेज कार प्रदर्शन भरले होते. विंटेज कार प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होत्या. या ठिकाणी विंटेज कार चालवण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. आपल्या देशाची सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी होतेय. पुनावाला यांच्या सारख्या व्यक्तींमुळे आपल्या देशाचा गौरव वाढला आहे.

आपली संस्कृती आत्मसात करून तिचे पालन करण्याची आपली परंपरा आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री म्हणाले की, प्रदर्शनाला एक लाख पेक्षा जास्त लोकांनी भेट दिली.

मुंबईत अशा प्रकारचे विंटेज कार संग्रहालय होण्याची गरजेचे असून राज्य सरकारने विंटेज कार संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली आहे. सदर मागणीसाठी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. विंटेज कार क्लब ऑफ इंडियातर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेनेत धुसफूस सुरु, पुण्याच्या बैठकीतून मोठ्या नेत्याचा काढता पाय

दोन दिवसात एक लाख पेक्षा जास्त नागरिकांनी दिली भेट दिली आहे. विंटेज कार व बाईक प्रदर्शनामध्ये 180 कार 80 बाईकचा समावेश होता. वर्ल्ड ट्रेड सेंटर ते मरीन ड्राईव्ह या मार्गावर या विंटेज कारची रॅली देखील काढण्यात आली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. 120 वर्षे जुनी रोल्स रॉईस सिल्व्हर घोस्ट, 100 वर्षे 1924 एमजी टीसी अशा विविध वाहनांचा यामध्ये समावेश होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube