प्रचाराला आता ‘ग्लॅमर’ आणि ‘धार’; अभिनेते प्रविण तरडे मैदानात, माळीवाड्यात रंगणार महाशक्तीप्रदर्शन

Ahilyanagar-प्रविण तरडे सोमवारी १२ जानेवारी रोजी आपल्या लाडक्या बहिणीच्या सादेला प्रतिसाद देत थेट प्रचाराच्या मैदानात उतरणार.

Ahilayanagar Mahapalika Pravin Tarade

Ahilayanagar Mahapalika Pravin Tarade

Ahilyanagar Mahanagarpalika Election: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची (Ahilyanagar Mahanagarpalika Election) रणधुमाळी आता शिगेला पोहोचलीय. प्रभाग क्रमांक 12 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप-राष्ट्रवादीचे (BJP -NCP) युतीचे अधिकृत उमेदवार शुभ्रा पुष्कर तांबोळी, अमोल निस्ताने, आरती रासकर आणि रुपाली जंजाळे यांच्या प्रचाराला आता ‘ग्लॅमर’ आणि ‘धार’ दोन्ही प्राप्त होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते, लेखक आणि ‘धर्मवीर’ फेम दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarade) सोमवारी १२ जानेवारी रोजी आपल्या लाडक्या बहिणीच्या सादेला प्रतिसाद देत थेट प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबतीला जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’, आणि ‘धर्मवीर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे प्रविण तरडे. केवळ एक अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक कसदार लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर मांडणी करण्यात त्यांचा हातखंडा असून, त्यांच्या संवादफेकीचा मोठा चाहता वर्ग आहे. सडेतोड बोलणे आणि जमिनीशी नातं सांगणारं व्यक्तिमत्व असल्यामुळे, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अशा लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा पाठिंबा मिळाल्याने प्रभाग 12च्या प्रचाराला मोठी धार चढली आहे.

अहिल्यानगरची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळीवाडा (प्रभाग १२) च्या राजकीय पटलावर यंदा एक अभूतपूर्व क्रांती पाहायला मिळत आहे. विकासाचा नवा संकल्प आणि राज्यभरात असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा जबरदस्त प्रभाव लक्षात घेऊन, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने येथे चक्क तीन महिला उमेदवारांना संधी देऊन निवडणुकीचे संपूर्ण समीकरणच बदलून टाकले आहे.

या रणधुमाळीत शुभ्रा तांबोळी, आरती रासकर आणि रुपाली जंजाळे या तीन ‘रणरागिणी’ आता विकासाचा झेंडा हाती घेऊन मैदानात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण पॅनेलमध्ये अमोल निस्ताने हे एकमेव पुरुष उमेदवार आहे. त्यांच्या सोबतीला असलेल्या या तीन खंबीर महिला उमेदवारांमुळे माळीवाड्याच्या राजकारणाला एक नवी आणि आश्वासक दिशा मिळाली आहे.

प्रविण तरडे यांच्या उपस्थितीत होणारा हा प्रचार दौरा भाजप आणि राष्ट्रवादी युतीच्या शक्तीप्रदर्शनाचा एक भाग असेल. यानिमित्ताने माळीवाडा आणि परिसरात मोठ्या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित उमेदवार, प्रविण तरडे यांची साथ आणि भाजपची संघटनात्मक ताकद यांच्या त्रिवेणी संगमामुळे प्रभाग 12 मधील निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. एकीकडे अनेक वर्षांचा अनुभव असलेले नेते आणि दुसरीकडे दांडगा जनसंपर्क व विकासाची ओढ असलेल्या शुभ्रा तांबोळी, अशा या लढतीत आता ग्लॅमरचा तडका लागल्याने विरोधकांची धडधड नक्कीच वाढली असणार, हे निश्चित!

Exit mobile version